प्रतिक्षा संपली! Royal Enfield क्लासिक 350 लाँच; पाहा Video

खूप प्रतीक्षेनंतर, रॉयल एनफिल्डने भारतात नवीन क्लासिक 350 ला प्रारंभिक एक्स-शोरूम 1.84 लाख रुपयांमध्ये लाँच केलं आहे.
प्रतिक्षा संपली! Royal Enfield क्लासिक 350 लाँच; पाहा Video
प्रतिक्षा संपली! राॅयल Royal Enfield 350 लाँच; पाहा VideoTwitter/ @royalenfield

खूप प्रतीक्षेनंतर, रॉयल एनफिल्डने भारतात नवीन क्लासिक 350 ला प्रारंभिक एक्स-शोरूम 1.84 लाख रुपयांमध्ये लाँच केलं आहे. रॉयल एनफील्डची क्लासिक- 350 5 व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ज्यात Redditch, Helkyon, Signals, Dark आणि Chrome यांचा समावेश आहे. नवीन क्लासिक 350 चे क्रोम व्हेरिएंट हे त्याचे टॉप मॉडेल आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 2.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये या बाईकचे योगदान सुमारे 80 टक्के आहे आणि मीटिऑर- 350 नंतर लाँच केलेले हे दुसरे नवीन मॉडेल आहे. या बाईकला मीटिऑर 350 सारखेच डबल क्रॅडल चेसिस देण्यात आले आहे.

रॉयल एनफील्ड (Royal Enfield) ने नवीन क्लासिक 350 (New Classic-350) मध्ये समान 349 सीसी सिंगल-सिलेंडर डीओएचसी इंजिन दिले आहे. जे 6,100 आरपीएम वर 20.2 बीएचपी पॉवर आणि 4,000 आरपीएम वर 27 एनएम पीक टॉर्क बनवते. कंपनीने या इंजिनसह 5 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, मोटरसायकल पहिल्या सारखीच आहे. जिचा थोडाफार प्रमाणात बदल झाला आहे. कंपनीने अनेक नवीन रंगांमध्ये बाईक सादर केली आहे आणि प्रत्येकाची किंमत वेगळी ठेवण्यात आली आहे. बाईकला एक भाग अॅनालॉग - एक भाग डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह एक लहान डिस्प्ले, इंधन गेज, ओडोमीटर आणि बरेच काही मिळते. बाईकच्या टॉप मॉडेलला ट्रिपर नेव्हिगेशन मिळते जे ब्लूटूथ द्वारे काम करते.

प्रतिक्षा संपली! राॅयल Royal Enfield 350 लाँच; पाहा Video
Video: पचांनी वाइड चेंडू दिला नाही; नाराज पोलार्डचा गंमतीदार विरोध

नवीन क्लासिक 350 चे हँडलबार आणि स्विचगियर 350 मीटिऑर सारखेच आहेत. ब्रेकमध्ये बदल केले गेले आहेत ज्यात पुढचे चाक 300 मिमी डिस्कसह आले आहे आणि मागील चाक 270 मिमी डिस्कसह आले आहे. भारतात या गाडीची स्पर्धा जावा क्लासिक आणि होंडा एहनेस सीबी 350 शी असणार आहे. त्यामुळे जे लोक या गाडीची वाट पाहत होते त्यांची प्रतिक्षा आता संपलेली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com