
अॅपलने १२ सप्टेंबरला आयफोन 15 भारतात लॉंच केला. फोनची प्री बुकिंग १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून विक्री २२ सप्टेंबरपासून होणार आहे. अॅपलने आयफोन १५ मध्ये नवीन फिचर्स जोडले आहे. या फिचरचा कार युजर्संना खूप फायदा होणार आहे. एखाद्या संकटात अडकलेला असेल तर हे फिचर तुम्हाला मदत करेन. हा स्मार्टफोन आता AAA सोबत सॅटेलाइट रोडसाइड असिस्टंटसह येणार आहे.
अॅपलने हे फिचर आयफोन १४ च्या सीरीजमध्येही उपलब्ध केले आहे. अॅपलच्या म्हणण्यानुसार, ईमरजन्सी एसओएस आणि रोड साइड असिस्टंट हे फिचर तुम्हाला २ वर्षांसाठी मोफत मिळणार आहे. हे फिचर कसे काम करेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
iPhone 15 मध्ये RSA चा उपयोग असा करा
मागील वर्षी सॅटेलाइट फिचरच्या माध्यमातून इमरजन्सी एसओएसचा लाँच करण्यात आला होता. हे फिचर कार चालवताना खूप उपयोगी आहे. जेव्हा ड्रायव्हरकडे सेल्युलर नेटवर्क आणि वाय फाय नसते अशा इमरजन्सी परिस्थितीत ही सेवा अॅपलच्या ईमरजन्सी टेक्स्टद्वारे सॅटेलाईट पर्याय वापरुन काम करु शकतात. अॅपलची ही नवीन रोडसाइड असिस्टंट सेवा फक्त युएसमध्ये उपलब्ध आहे.
आयफोन युजर्संना करणार मार्गदर्शन
जर तुम्हाला कारमध्ये कोणतीही अडचण येत असेल तर इमरजन्सी sos पाठवण्यास मदत करु शकते. याच्या मदतीने कार लॉक करणे, इंधन संपल्यावर किंवा बॅटरी संपल्यावर तुम्ही मदतीसाठी संदेश पाठवू शकतात. अॅपलने सांगितले की, युजर्संना सॅटेलाइटशी कनेक्ट होण्यासाठी मार्गदर्शन दिले जाईल. जेणेकरुन युजर्सचा AAA एजंटशी चॅट करु शकतील आणि त्यांच्या स्थितीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करु शकतील.
फिचर्स
जेव्हा युजर्स ईमरजन्सी परिस्थितीत AAA शी कनेक्ट होईल तेव्हा तेथील वातावरण समजून घेण्यासाठी काही प्रश्न स्क्रिनवर पॉप अप होतील. उत्तर मिळाल्यावर एएए सॅटेलाइटद्वारे आवश्यक माहिती पाठवली जाईल. जेणेकरुन योग्य ती मदत मिळेल.
एखाद्या जंगलात किंवा नेटवर्क नसलेल्या जागेत जर तुम्ही अडकला असाल तर तिथे सॅटेलाईटद्वारे माहिती देणे अवघड आहे. तेव्हा हे फिचर काम करेल. ही सुविधा मिळवण्यासाठी कार रस्त्याच्या जवळ असणे आवश्यक आहे. ऑफ रोड कार असेल तर ही सुविधा वापरता येणार नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.