Make In India AirPods: मेक इन इंडियाची घोडदौड सुरुचं! iPhoneनंतर आता अ‍ॅपल AirPods चे उत्पादन भारतात

Apple To Begin AirPods Manufacturing In India : अ‍ॅपलच्या उत्पादनांची आवड असणाऱ्या सर्व गॅजेटप्रेमींसाठी एक बातमी समोर येत आहे.
Make In India
Make In IndiaSaam Tv

AirPods Manufacturing In India :

अ‍ॅपलच्या उत्पादनांची आवड असणाऱ्या सर्व गॅजेटप्रेमींसाठी एक बातमी समोर येत आहे. आता तुम्हाला Apple चे वायरलेस इयरबड्स म्हणजेच AirPods परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहेत.

खरं तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयफोन निर्माता टेक कंपनी Apple फॉक्सकॉनच्या हैदराबाद फॅक्टरीमध्ये वायरलेस इअरबड्स, एअरपॉड्सचे उत्पादन सुरू करणार आहे.

आयफोन नंतर एअरपॉड मेड इन इंडिया होणार

अ‍ॅपलचे हे दुसरे उत्पादन आहे जे भारतात (India) तयार होणार आहे. याआधी अमेरिकन कंपनीने आपल्या लोकप्रिय उत्पादन आयफोनचे भारतात उत्पादन करण्याची घोषणा केली आहे.

Make In India
iPhone 16 Pro Max Features : Apple ची मोबाईल फोटोग्राफी बदलणार, iPhone 16 Pro Maxमध्ये दिसणार ही जबरदस्त कॅमेरा सिस्टम

उत्पादन कधी सुरू होईल?

Foxconn ने हैदराबाद प्लांटसाठी US$ 400 दशलक्ष गुंतवणुकीला मान्यता दिली आहे, जे डिसेंबर 2024 पर्यंत मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करेल. एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. आता एअरपॉड देखील मेड-इन-इंडिया असेल. एअरपॉड्स आता भारतात बनवल्या जाणार्‍या आयफोन नंतरची दुसरी उत्पादन श्रेणी असेल. Apple चे AirPods जागतिक स्तरावर TWS (True Wireless Stereo) मार्केटमध्ये आघाडीवर आहेत.

एअरपॉडची हिस्सेदारी किती आहे?

रिसर्च (Research) फर्म Canalys च्या मते, Apple च्या AirPods चा डिसेंबर 2022 च्या तिमाहीत जागतिक TWS मार्केटमध्ये सुमारे 36 टक्के हिस्सा होता. अ‍ॅपलनंतर सॅमसंग 7.5 टक्के, शाओमी 4.4 टक्के, बोट 4 टक्के आणि ओप्पो 3 टक्के आहे. याशिवाय, Xiaomi ने नोएडा येथील Optimus Electronics प्लांटमध्ये यावर्षी भारतात आपले TWS तयार करण्यास सुरुवात केली.

Make In India
Make In India : मेक इन इंडियाची भरारी! लवकरच IT कंपन्यांना मिळणार भारतीय ब्रँडचे लॅपटॉप- हार्डवेअर Product

अ‍ॅपल ही सेवा बंद करणार आहे -

Apple iPhone आणि iPad वापरकर्त्यांसाठी iTunes Movie Trailers अ‍ॅप बंद करत आहे. अ‍ॅपल (Apple) आयट्यून्स मूव्ही ट्रेलर्स बंद करण्याची तसेच त्याच्या अ‍ॅपल टीव्ही अ‍ॅपवर प्रसारित करण्याची योजना आखत आहे. 2011 मध्ये Apple ने iPhone आणि iPad वापरकर्त्यांसाठी iTunes Movie Trailers अ‍ॅप जारी केले होते, जे वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com