iPhone 15 च्या 'या' मॉडेलसाठी 2 महिने करावी लागेल प्रतीक्षा, काय आहे कारण?

iPhone 15 Pro मॉडेलसाठी 2 महिने करावी लागेल प्रतीक्षा, काय आहे कारण?
iPhone 15
iPhone 15Saam Tv

iPhone 15 Pro:

Apple ने अलीकडे आयफोन 15 सीरीज मॉडेल लॉन्च केले आहेत. जे जागतिक स्तरावर अॅपल युजर्सच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कंपनीने आयफोन 15 सीरीजसाठी प्री-ऑर्डर घेणे सुरू केले आहे आणि ग्राहकही याला जोरदार प्रतिसाद देत आहेत.

iPhone 15 ला इतकी मोठी मागणी पाहून कंपनीही स्वतः आश्चर्यचकित झाली आहे. Apple 22 सप्टेंबरपासून नवीन फोनची शिपिंग सुरू करणार आहे. मात्र iPhone 15 Pro खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. याचं कारण म्हणजे या फोनला सर्वाधिक मागणी असल्याने कंपनीने याचा डिलिव्हरीचा कालावधी दोन महिन्यांनी वाढवला आहे. म्हणजे ग्राहकांना या फोनसाठी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. जगभरातील ज्या युजर्संनी आयफोन 15 प्रो प्री-बुक केले आहे, त्यांना किमान 6 ते 8 आठवडे प्रतीक्षा करावी लागेल.

iPhone 15
Gujarat News: १० वर्षीय मुलीनं IPS अधिकाऱ्यांसह ८० पोलिसांना गरगर फिरवलं; कहाणी क्राइम पट्रोलपेक्षाही भयंकर निघाली!

भारतात 8 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी

मार्क गुरमनने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, भारत, चीन, यूके आणि कॅनडामध्ये आयफोन 15 प्रो मॅक्स डिलिव्हरीला 8 आठवड्यांपर्यंत विलंब होऊ शकतो. हा विलंब नवीन iPhones च्या होम डिलिव्हरी आणि इन-स्टोअर पिकअप दोन्हीसाठी लागू आहे. (Latest Marathi News)

काही मार्केटमध्ये नियमित iPhone 15 आणि iPhone 15 Plus ऑर्डर दोन आठवड्यांपर्यंत विलंब होत आहेत. Apple ने आयफोन 15 सीरीजमध्ये केलेल्या अपग्रेडमुळे अनेक युजर्स नवीन आयफोनकडे आकर्षित झाले आहेत. भारतात iPhone 15 Pro ची प्रारंभिक किंमत 1,34,900 रुपये असली तरी देशात याला प्रचंड मागणी आहे.

iPhone 15
Marathwada Cabinate Meeting: मराठवाड्यासाठी 46 हजार कोटींचं पॅकेज जाहीर; कोणती होणार विकास कामे? जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Apple ने iPhone 15 Pro आणि 15 Pro Max मध्ये टायटॅनियम फ्रेमचा वापर केला आहे. आयफोनच्या मेटॅलिक फ्रेमला रंग देण्यासाठी कंपनी एनोडायझेशन वापरते. iPhone 15 Pro उत्पादनातील आणखी एक आव्हान म्हणजे त्याचा प्रोसेसर. iPhone 15 Pro मधील A17 Pro 3nm आर्किटेक्चरवर आधारित आहे. या चिपच्या निर्मितीसाठी अॅपल पूर्णपणे TSMC वर अवलंबून आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com