Hair Care Tips : हेअर वॉश करण्यापूर्वी 2 तास अगोदर केसांना लावा तेल, होतील अधिक लाभ !

Hair Wash Time : काही लोकांना रात्री केसांना तेल लावून दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करण्याची सवय असते
Hair Care Tips
Hair Care Tips Saam Tv

Oiling Before Hair Wash : केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी हेअर ऑईल लावणे गरजेचे असते पण बरेचजण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे केस कोरडे पडतात आणि कमजोर होतात. तसेच केस तुटायला सुरू होऊन टक्कल पडण्याची शक्यता असते. केसांना नियमितपणे तेल लावणे महत्त्वाचे असते त्यामुळे केस मजबूत राहतात.

काही लोकांना रात्री केसांना तेल लावून दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करण्याची सवय असते पण काही करणामुळे जर रात्री केसांना ऑइल लावायला मिळाले नाही. तर हरकत नाही तुम्ही केस धुण्यापूर्वी दोन तास आधी केसांना तेल लावू शकता. त्यामुळे केसांना होतील अनेक फायदे तर जाणून घेऊया त्याविषयी माहिती.

Hair Care Tips
Hair Falls Problem: वजन कमी तर होतेच पण केसगळतीची समस्या अधिक का? जाणून घ्या कारण

केस धूण्यापूर्वी दोन तास आधी तेल लावण्याचे फायदे (Benefits)

1. केस गळती कमी होईल

केस धुण्यापूर्वी साधारणपणे एक किंवा दोन तास आधी केसांना तेल लावून ठेवल्याने केस गळती सारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते किंवा केसांच्या इतर समस्या पासूनही सुटका मिळेल. केसांना तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत केस तुटणार नाही आणि केसाचा कोरडेपणा कमी होईल. केसांना तेल लावल्याने केस अधिक जास्त मजबूत होतात म्हणून जरी तुम्हाला आवडत नसेल तरी केस धुण्यापूर्वी तेल लावून हेअर मसाज करावे.

2. केस मजबूत होतील

केसांना तेल लावल्याने टाळूची रक्त परिसंचरण वाढते. केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावून तुम्ही केस मजबूत करू शकता. पण आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी केसांना तेल लावणे गरजेचे असते त्यामुळे केस तुटणे कमी होते आणि केसांना मजबुती मिळण्यास सहकार्य मिळते.

Oiling Before Hair Wash
Oiling Before Hair Washcanva

3. केसांची वाढ

केसांची (Hair) वाढ वेगाने होण्यासाठी केसांना तेल लावणे गरजेचे आहे. रोज केसांना तेल लावण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा (Time) केस धुण्यापुर्वी १/२ तास आधी तेल लावून हेअर वॉश करू शकता. तेलाने टाळूमध्ये रक्तभिसरण वाढते आणि केसांना मजबूती मिळून केसांची वेगाने वाढ होऊ लागते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com