
ज्या व्यक्तींना व्यावसायासाठी परदेशात जावे लागते. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हे महत्त्वाचं कागदपत्रं असतं. ज्या देशात तुम्ही जाणार आहात तर तुमच्याकडे पासपोर्टसह त्या देशाचा व्हिसा असणं आवश्यक असतं. व्हिसा (Visa) मिळवण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट(Passport) असणं आवश्यक असतं.
पासपोर्टच्या माध्यमातून नागरिकांचे नागरित्व माहिती होतं असतं. यामुळे तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुम्हाला आधी पासपोर्ट बनवा लागेल. जर तुम्हाला पासपोर्ट बनवायचं असेल तर पासपोर्ट कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाहीये. कारण तुम्ही आता घरी बसून पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात.
पासपोर्टसाठी अॅपवरूनही करू शकतात अर्ज
पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी सरकारनं एम पासपोर्ट सेवा नावाचं अॅप बनलवलं आहे. त्याच्या माध्यमातून कोणताही भारतीय व्यक्ती अर्ज करू शकतो. या अॅपच्या माध्यमातून साधरण पासपोर्ट बनवण्यासाठी १ हजार ५०० रुपयांचे शुल्क भरावे लागतील. तर पासपोर्ट बनवण्यासाठी ३ हजार ५०० रुपयांची शुल्क भरावे लागले. तर ८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी साधरण पासपोर्ट बनवत असाल तर लागणाऱ्या शुल्कात १० टक्क्याची सुट मिळते.
म्हणजेच १ हजार ५०० रुपयांच्या ऐवजी १ हजार ३५० रुपये द्यावी लागतील. जर तुम्ही साधरण पासपोर्ट बनवू पाहत आहात तर त्यासाठी १५ दिवस लागतात. तर तात्काळ पासपोर्टसाठी तीन दिवस लागतात. तात्काळ पासपोर्ट बनवले असेल तर पासपोर्ट आधी येते. नंतर पोलीस पडताळणी होत असते.
कसा कराल अर्ज
सर्वात आधी मोबाईलमध्ये एम पासपोर्ट सेवा अॅप डाऊनलोड करा.
यात पासपोर्टसाठी नोंदणी करावी लागेल. त्यातील न्यू यूझर रेजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
रजिस्टेशन करण्यासाठी तुम्ही आधी तुमचे नाव, जन्म तारीख, ईमेल आयडी, आणि इतर माहिती भरा.
आता पासवर्ड बनवा.
त्यानंतर कॅप्चावर क्लिक करा आणि सबमिट बटन दाबा.
पासपोर्ट कार्यालय तुम्हाला तुमच्या मेलवरुन एक व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी कोड पाठवले.
त्यानंतर तुम्ही तुमच्या मेलवर जाऊन त्याला क्लिक करा. त्यानंतर लॉगिन करा.
त्यानंतर तुम्ही अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्टच्या पर्यायाला निवडा.
यानंतर पासपोर्टची कोणती सेवा घ्यायची आहे, ते निवडा
सर्वात आधी तुम्ही तुमच्या जवळील एक पासपोर्ट कार्यालय निवडा. त्यानंतर भेटीची तारीख निश्चित करा. त्यानंतर तुम्हाला तारीख मिळेल.
त्यानंतर पासपोर्टसाठी लागणारे शुल्क जमा करावी.
त्यानंतर खात्री केल्यानंतर एक एसएमएस येईल.
तुम्ही तुमचे कागदपत्र आणि फोटो आयडी तसेच रहिवाशी असल्याचा दाखला जमा केला जाईल.
मुलाखतीच्या तारखेला तुम्ही पासपोर्ट कार्यालयात जावे. तेथे तुमचा अर्ज जमा करावा. तेथे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
त्यानंतर पोलीस कर्मचारी तुमच्या घरी येऊन तुमचा पडताळणी करतील.
त्यानंतर तुम्ही टपाल मार्फत १५ दिवसानंतर पासपोर्ट मिळवू शकतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.