Aprilia RS 457 : Aprilia RS 457 : बारामतीची आणखी एक ओळख बनणार, KTM ला टक्कर देणार जबरदस्त स्पोर्ट्स बाईक

Aprilia RS 457 Features : Aprilia RS 457 मेड इन इंडिया असून याचा प्लांट हा बारामतीत सुरु आहे.
Aprilia RS 457
Aprilia RS 457Saam Tv

Aprilia RS 457 VS KTM RC390 :

सप्टेंबर महिन्यात Aprilia RS 457 लॉन्च होणार आहे. याचे जागतिक स्तरावर पदार्पण होणार आहे. याचे उत्पादन हे मेड इन इंडिया असून याचा प्लांट हा बारामतीत सुरु आहे. ही बाईक जागतिक बाजारपेठेत प्रदर्शित करण्यात येणार आहे.

20 सप्टेंबर रोजी भारतात ही स्पोर्ट्स लुक लॉन्च होणार आहे. भविष्यात KTM RC 390 ला टक्कर देईल असे कंपनीचे मत आहे. सुरूवातीला अपेक्षा होती की, मोठ्या RS 660 प्रमाणे या बाईकचे नाव RS 440 असेल. पण एप्रिलियाने त्याचे नाव RS 457 ठेवले. ही इंटालियन कंपनी असून जाणून घेऊया याच्या मायलेज आणि लूक बद्दल.

Aprilia RS 457
Soaked Walnuts Benefits : चिमुकल्यांना महिनाभर खाऊ घाला 3-4 भिजवलेले अक्रोड, बुद्धी होईल तल्लख

1. Aprilia RS 457 चे डिझाईन

Aprilia RS 457 ही स्पोर्ट्स बाइकमध्ये एलईडी डीआरएल, फुल-एलईडी लाइटिंग आणि टू-इन-वन अंडरबेली एक्झॉस्ट मिळते आहे. तसेच या बाइकमध्ये नवीन अॅल्युमिनियम फ्रेमही आहे जी जगभरातील रेसट्रॅकवर लॉन्च करण्यात येईल असे कंपनीने (Company) म्हटले आहे. याचे वजनही कमी असेल ज्यामुळे ती सहज वापरु शकता.

2. वैशिष्टये

Aprilia RS 457 स्पोर्ट्स बाइकच्या (bike) पुढील भागात शॉर्ट व्हिझर आणि क्लिप-ऑन हँडलबार, शॉर्ट टेल सेक्शन आणि अंडरबेली एक्झॉस्टसह ड्युअल एलईडी हेडलॅम्प मिळणार आहे. तसेच बाइकला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 3-स्टेज ट्रॅक्शन कंट्रोल आणि ABS सह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोनही मिळेल.

3. इंजिन

Aprilia RS 457 मध्ये 457 cc लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन, DOHC इंजिन आहे, जे 47 bhp साठी ट्यून केलेल्या 4-व्हॉल्व्ह इंजिनमधून पॉवर काढेल. यामध्ये एक्झॉस्ट नोटसाठी बाईक 270-डिग्री कनेक्टिंग रॉड असेंब्ली मिळते आहे. या बाइकचे वजन केवळ १७५ किलोग्रॅम कर्ब वेटसह उत्कृष्ट पॉवर-टू-वेट देते आहे. त्यामुळे तिचे रिक्त वजन १६९ किलो आहे. मीडिया रिपोर्टनुसार या बाइकची किंमत ही ५ लाखांच्या आत असेल असे म्हटले जात आहे. तसेच बाइकचा टॉप स्पीड हा 180 kmph असेल.

Aprilia RS 457
Soaked Walnuts Benefits : चिमुकल्यांना महिनाभर खाऊ घाला 3-4 भिजवलेले अक्रोड, बुद्धी होईल तल्लख

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com