
Parenting Tips For Kids Habits : आज कालच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये अनेक कपल सिंगल बेबी ठेवणे पसंत करतात. एकुलत एक मुल असल्यावर कोणतेही पाच प्रकार जास्तीत जास्त वेळ त्यांच्या मुलांना देऊ शकतात.
परंतु अनेक वेळा पालकांच्या (Parents) अतिप्रेमामुळे लहान मुलं बिघडतात. अशातच तुमचे मुल सुद्धा एकुलते एक असेल तर, तुम्ही या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. अशातच काही खास गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्या मुलांवर (Children) चांगले संस्कार करू शकता.
तसं पाहायला गेलं तर सगळी मुलं आई-वडिलांसाठी समान असतात. परंतु एकुलत्या एक अपत्याला सांभाळत असताना अनेक पालक काही गोष्टींची चुक करतात. त्याचा वाईट प्रभाव तुमच्या मुलांवरती पडतो. सोबतच तुमचे मुलं बिघडू लागते.
तुमच्या मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकू नका -
एकुलत्या एक अपत्याकडून पालकांच्या अनेक अपेक्षा असतात. परंतु अनेक मुलं पालकांच्या अपेक्षांवर खरं उतरत नाही. असं झाल्याने अनेक पालक निराश होतात आणि मानसिक तणावाचे शिकार होतात. त्यामुळे एकुलते एक मूल असल्यावर त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका.
सक्ती करू नका -
एकुलत्या एक अपत्याच्या सेफ्टीला घेऊन अनेक पालक चिंतेत असतात. अशावेळी अनेक पालक त्यांच्या मुलांना वेळोवेळी टोकत राहतात. त्यामुळे मुलं स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या मुलाला थोडं स्वातंत्र्य द्या. जेणेकरून तुमचा मुलगा सेल्फ डिपेंडंट बनेल.
दुनियादारी समजून सांगा -
एकुलत्या एक अपत्याला बिघडण्यापासून वाचवण्यासाठी अनेक पालक त्यांच्या मुलांना बाहेरील जगापासून दूर ठेवतात. परंतु असं करणार अत्यंत चुकीच आहे. असं केल्याने तुमचे मुल स्वतःला एकटे समजू लागेल. सोबतच तुमचे मुल आयुष्यामधील समस्यांना लढण्यापासून स्वतःला असमर्थ समजेल. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच दुनियादारीचे ज्ञान देणे गरजेचे आहे.
तुमच्या मुलांना स्पेस द्या -
अनेक पालक त्यांच्या एकुलत्या एक अपत्याला कुठल्याही गोष्टीची कमी भासू देत नाही. परंतु असं केल्याने तुमचे मुल कोणत्याही गोष्टीची व्हॅल्यू करणे विसरून जाईल. अशावेळी तुम्ही तुमच्या अपत्या पासून लांब रहा आणि त्याला थोडी स्पेस द्या. असं केल्याने तुमच्या मुलाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होऊ लागेल. सोबतच स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम होईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.