Vitamin C Deficiency : त्वचेवर दिसताय 'ही' लक्षणे ? असू शकते व्हिटॅमिन सी कमतरता !

Vitamin C Deficiency Symptoms : तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी झाले तर लगेच त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरती पाहायला मिळतो.
Vitamin C Deficiency
Vitamin C DeficiencySaam Tv

Skin Care Tips : व्हिटॅमिन सी हे एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहे. आतून आणि बाहेरून हेल्दी बनवण्याचे काम करते. अशातच जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी झाले तर लगेच त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरती पाहायला मिळतो.

सतेज कांतीसाठी व्हिटॅमिन (Vitamins) सी हे अत्यंत गरजेचे असते. चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी व्हिटॅमिन सी आपण खाण्यापिण्यामधून आणि सौंदर्यप्रसाधनांमधून मिळवत असतो. व्हिटॅमिन सी हे एक अँटिऑक्सिडेंट आहे.

Vitamin C Deficiency
Skin Care : बदलत्या ऋतूमानात अशी घ्याल त्वचेची काळजी, जाणून घ्या नाईट स्किन केअरबद्दल

जो आपल्या त्वचेचा (Skin) टोन व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि आपली स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतो. तुम्ही बरेचदा पाहिले असेल की अनेक व्यक्ती व्हिटॅमिन सीचे ब्युटी प्रॉडक्ट वापरतात. या प्रॉडक्टमध्ये अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमची स्किन आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी हेल्दी (Healthy) राहते. त्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन सी ची कमी झाल्याने त्याचा परिणाम लगेचच तुम्हाला तुमच्या त्वचेवर पाहायला मिळतो.

1. जखम भरण्यास वेळ लागणे :

व्हिटॅमिन सी ची सर्वात मोठी निशाणी म्हणजे जखम उशिराने भरणे. शरीरामधील व्हिटॅमिन सीच्या कमीमुळे कॉलेजन हळु बनू लागते आणि यामुळेच तुमची जखम लवकर भरली जात नाही. साल १९४२ मध्ये असे समोर आले की, स्कर्वी हा आजार झालेल्या व्यक्तींमध्ये जखम लवकर न भरण्याची लक्षणे आढळून येतात. स्कर्वी हा रोग व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतो. व्हिटॅमिन सी हे अँटिऑक्सिडेंट टिशूज ठीक करण्यासाठी आणि सूज आणि ऑक्सिडेशन पासून होणाऱ्या नुकसानांपासून कमी करते.

Vitamin C Deficiency
Soft And Glowing Skin : त्वचेला सॉफ्ट आणि ग्लोविंग बनवण्यासाठी 'या' गोष्टी नक्की वापरून पहा

2. सुरकुत्या :

व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे चेहऱ्यावरती सुरकुत्या आणि फाईन लाईन्स दिसू लागतात. जेव्हा शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन सी भेटत नाही तेव्हा तुमची त्वचा अतिशय ड्राय पडते. आणि या समस्येमुळे कपाळावरती, डोळ्याखाली आणि मंकी माऊथ येथे सुरकुत्या पडतात.

3. रॅशेज :

त्वचेवरती रेशेज होने हे सुद्धा व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे लक्षण आहे.

4. पिंपल्स :

चेहऱ्याच्या त्वचेवर संक्रमण होणे आणि लवकर ठीक न होणे हे सुद्धा व्हिटॅमिन सी च्या कमतरतेचे लक्षण आहे. या समस्येमुळे त्वचेवरती पॅचेस सुद्धा दिसू लागतात.

व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर करण्यासाठी या फळांचे सेवन करा :

1. संत्री :

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी उपलब्ध असते. संत्रे दिसायला जेवढे सुंदर दिसते तेवढेच व्हिटॅमिन सी च्या गुणांनी परिपूर्ण असते.

Vitamin C Deficiency
Skin Care Tips : त्वचेची काळजी घेण्यासाठी काकडीचा असा करा उपयोग, त्वचा चमकण्यासोबत वृद्धत्वाचा प्रभावही कमी होईल!

2. आवळा :

शरीरामधील व्हिटॅमिन सी ची कमी दूर करण्यासाठी तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता. जर तुम्ही आवळ्याचे सेवन करतात तर तुम्हाला तीस संत्रा एवढे व्हिटॅमिन सी मिळेल.

3. किवी :

किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी उपलब्ध असते. किवीमध्ये 137.4 मीलिग्राम व्हिटॅमिन सी उपलब्ध असते. सोबतच पोटॅशियम, कॉपर, आणि आयन सुद्धा भरपूर प्रमाणात असते. त्यासोबतच पपई, लिंबू, स्ट्रॉबेरी, शिमला, मिरची या सगळ्या फळभाज्यांमध्ये देखील व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com