
Health Tips : चहा बद्दल सांगायचं झालं तर माणसाच्या दिवसाची सूरवात होते ती म्हणजे एक कप चहाने. खूप कमी लोक असतील ज्यांना चहा आवडत नसेल. बाकी इथले सगळेच चहाप्रेमी आहेत. अनेकांनी तर चहावरती कविता देखिल केल्या आहे. पण या लाडक्या चहाला आता टाटा करण्याची वेळ आली आहे असं म्हणायला हरकत नाही. चहाचे अतिसेवन तुमच्या आरोग्याला (Health) हानिकारक ठरू शकते.
चहा फक्त भारतातचं नाही तर विदेशात देखिल खुप लोकप्रिय झाला आहे. चहा इतका लोकप्रिय झाला आहे की जगभरात (World) विविध प्रकारचे चहा ऊपलब्ध झाले आहे. प्रेमाचा चहा, येवले अमृततुल्य, अव्वल चहा अशा प्रकारच्या अनेक ब्रांचेस आहेत. ज्यांना तरुणांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
मूड रिफ्रेश करायचा असेल तर आपण लगेच एक कप चहा बनवून फुरक्या मारत पितो. थंडीच्या दिवसांत तर आपण उठ सूट चहा बनवून पित असतो. पण हा चहाचं तुमच्या अरोग्याबरोबर खेळणार असेल तर तुम्ही काय कराल. होय चहाने तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. चहाच्या अतिसेवनामुळे तुम्हाला स्केलेटल फ्लोरोसिस या नावाचा आजार जडू शकतो. हा आजार तुमच्या शरीरातील हाडांना आतमधून ठिसूळ बनवण्याचे काम करतो.
जर तुम्ही जास्त प्रमाणात चहा पित असाल तर लगेचच सावधान व्हा. नाहीतर तुम्ही सुद्धा स्केलेटल फ्लोरोसिस या आजाराला बळी पडू शकता. स्केलेटल फ्लोरोसिस हा हाडांचा आजार आहे. ज्यामध्ये आपली हाडे आतमधून आपोआप ठीसुळ बनू लागतात.
स्केलेटल फ्लोरोसिस झालेल्या रोग्यांना अर्थराइटिस या आजारासारखं दुःखन जाणवत. या आजारामध्ये आपली हाडे - सांधे खुप दुखू लागतात. हा रोग झाल्यावर आपल्या हातापायंमध्ये आणि कंबरमध्ये जास्त दुखू लागतं. लगातार चहाचा सेवन करणाऱ्या लोकांना स्केलेटन फ्लोरोसिस होण्याची संभावना जास्त असते. चहामध्ये असणारे फ्लोराईड मिनरल हाडांसाठी खूप नुकसानदायक असते.
स्केलेटन फ्लोरोसिसची लक्षणे -
1. कमी वयात म्हातारपणाची लक्षणे.
2. खाली वाकायला आणि बसायला न येणे.
3. दातांमध्ये पिवळेपणा दिसणे.
4. खांदा,हात - पाय आणि सांध्यांमध्ये जास्त प्रमाणात दुखणे.
5. गुडघ्यांना सूज येणे.
6. पोट जड होणे.
यांसारखी लक्षणे असलेली मानसं स्केलेटन फ्लोरोसिसची शीकर बनू शकतात. चहाच्या अधिक सेवनामुळे फक्त स्केलेटल फ्लोरोसिसचं नाही तर आणखीन अन्य आजार देखिल उद्भवू शकतात.
रिकाम्या पोटी चहा पिल्यास तुम्हाला अल्सर, हायपर ऍसिडिटी, मळमळणे आणि भीती वाटणे अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. दिवसातून तीन कप चहा पिणे हे धोकादायक नाही आहे परंतु तुम्ही त्याहून अधिक प्रमाणात चहा पित असाल तर तुम्ही लवकरच स्केलेटल फ्लोरोसिस या आजाराचे शिकार बनू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.