
Personality Development : प्रत्येक व्यक्तीला पुढे जाऊन, सोबतच नवीन गोष्टींचा अभ्यास करून स्वतःच्या बुद्धीमध्ये आणि समजून घेण्याच्या पद्धतीमध्ये दायरा वाढवायचा असतो. आज आम्ही तुम्हाला सगळ्या सवयींबद्दल सांगणार आहोत ज्यामधून तुम्हाला हे कळेल की, आपण स्मार्ट आहोत की नाही.
कोणतीही व्यक्ती स्मार्ट आहे की नाही हे तेव्हाच कळत जेव्हा, ती प्रत्येक सिच्युएशनला अगदी सहजरीत्या हँडल करते. कोणत्याही व्यक्तीच्या चालण्या बोलण्यामधून हे समजून येते की तो स्मार्ट आहे की नाही.
परंतु स्मार्टनेस ही एक अशी गोष्ट आहे जी एका दिवसामध्ये येत नाही. व्यक्तीला निरंतर पुढे जाऊन, अभ्यास करून, नवीन गोष्टी शिकून आणि ज्ञानामध्ये भर टाकून पुढे जायचे असेल तर, आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचे स्मार्टनेसचे गुण आणि लक्षणे ओळखता येतील.
1. प्रश्न विचारणे :
स्मार्ट लोकांची पहिली सवय म्हणजे, ते प्रश्न विचारायला अजिबात घाबरत नाही. जर एखादी गोष्ट येत नसेल तर ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रश्न विचारत राहतात. प्रश्न विचारल्यानंतर स्वतःची चूक तर आपल्याला समजते, सोबतच ती चूक आपण पुन्हा करत नाही. योग्य उत्तर माहित नसताना चुका करणे हा अतिशय मूर्खपणा आहे. परंतु उत्तर जाणून घेऊन पुन्हा ती चूक करणे ही समजदारी आहे.
2. शिकण्याचा प्रयत्न करा :
ज्या व्यक्तीला (Person) असे वाटते की तो एकदम बरोबर आहे, तो परफेक्ट आहे आणि त्याला सगळेच येत, असे व्यक्ती कमीत कमी नवीन गोष्टी शिकू शकतात. अशातच नवीन गोष्टींकडे त्याचा अप्रोच देखील नसतो. परंतु समजदार व्यक्ती कधीही त्याच्या आत्मविश्वासाला घमंडमध्ये बदलत नाही.
3. शिकत राहाणे :
स्मार्ट व्यक्ती नेहमीच स्वतःच्या ज्ञानामध्ये भर वाढवण्याचे काम करत असतो. त्यासाठी तो व्यक्ती पुस्तके वाचतो. पुस्तके वाचल्याने आपण अनेक प्रकारच्या नवीन गोष्टी शिकतो. तुम्ही पेपर वाचा किंवा पुस्तके (Books) किंवा एखादा ब्लॉग, स्मार्ट लोकांची ओळख म्हणजे ते आपला वेळ (Time) शिकण्यात आणि लिहिण्या वाचण्यात घालवतात.
4. घमंड करत नाही :
स्वतःचच कौतुक करत राहणे आणि स्वतःला स्मार्ट म्हणणे ही एखाद्या स्मार्ट व्यक्तीची ओळख नाही. असे व्यक्ती स्वतःच्या समजूतदार पणाला जास्त महत्त्व देत नाही आणि त्या गोष्टीचा जास्त प्रसार करत नाही.
5. दुसऱ्यांच्या कामांमध्ये लुडबुड करत नाही :
समजूतदार व्यक्ती स्वतःच्याच कामांमध्ये आणि आयुष्यामध्ये एवढा मग्न झालेला असतो की त्याला दुसऱ्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काय चालले आहे या गोष्टीने फरक पडत नाही. या लोकांजवळ स्वतःच्याच आयुष्यामध्ये व्यस्तता निर्माण झालेली असते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.