Health tips : रात्री सतत झोप मोड होतेय ? या पदार्थांचा आहारात समावेश करा

आपली झोप पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ लागतो.
Health tips, Sleeping problems, Food
Health tips, Sleeping problems, Foodब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : निरोगी राहण्यासाठी आपल्याला आरोग्यदायी पदार्थांसोबतच पुरेशी झोपही गरजेची आहे. आपली झोप पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ लागतो.

हे देखील पहा -

बरेच लोक हे दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन किंवा थकवा आल्यानंतरही शांतपणे झोपू शकत नाही. एकदा आपल्या झोपेचे चक्र बदलेले की ते सुरळीत करणे कठीण असते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण औषधांची मदत घेत असतो. ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागते. परंतु, या समस्येपासून बरेच लोक त्रस्त आहेत. यातून सुटका कशी करता येईल हे जाणून घेऊया.

१. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, असे म्हटले जाते. ज्या लोकांना रात्री झोपेचा त्रास होतो त्यांनी आपल्या आहारात बदामाचा समावेश करावा. यामुळे आपल्याला जलद आणि चांगली झोप येण्यास मदत करेल. रात्री झोपण्यापूर्वी दोन बदामांचे सेवन केल्यास झोपेची समस्या कमी होऊ शकते.

Health tips, Sleeping problems, Food
Nagpanchmi 2022 : नागपंचमीला अर्पण केल्या जाणाऱ्या ज्वारीच्या लाह्या कशा बनवल्या जातात?

२. कॅमोमाइल चहामध्ये एपिजेनिन आढळते, ज्यामुळे झोप न येण्याची समस्या कमी होते. ज्या लोकांना रात्री झोपेचा त्रास होतो त्यांनी कॅमोमाइल चहा घ्यावा. या चहाचे सेवन केल्याने झोप तर येतेच पण चिंताही कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी हा अँटिऑक्सिडेंट युक्त कॅमोमाइल चहा घेऊ शकता.

३. हळदीचे दूध (Milk) पिणे पोटासाठी आणि आरोग्यासाठी चांगले असते. रात्री दूध प्यायल्याने चांगली झोप येते. निद्रानाशाचा त्रास होत असेल तर आहारात दुधाचा समावेश करा. रात्री हळदीचे दूध प्यायल्याने गाढ आणि शांत झोप लागते. याशिवाय दूध प्यायल्याने दिवसभराचा थकवाही दूर होतो.

४. चांगल्या झोपेसाठी माशांचे सेवन केले पाहिजे. आठवड्यातून तीनदा मासे खाल्ल्याने चांगली झोप मिळेल. माशांमध्ये जीवनसत्त्वाची (Vitamins)-ड आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळतात, ज्यामुळे झोपेची समस्या कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com