Weight loss Journey : तुम्ही देखील वेट लॉस करताय ? वजन कमी होण्यासोबतच आरोग्याला मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या

weight loss करण्यासाठी कोणी ग्रीनटी चा सहारा घेत तर कोणी मॉर्निंग वॉकला जातं.
Weight loss Journey
Weight loss Journey Saam Tv

Weight loss Tips: वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो परंतु, वाढलेलं वजन आटोक्यात आणण्यासाठी किती जरी प्रयत्न केले तरी ते कठीणचं.

बाहेरील तेलकट पदार्थ खाऊन तुमचे वजन वाढते त्यामुळे बरचे लोक नवनवीन प्रयोग करत असतात weight loss करण्यासाठी कोणी ग्रीनटी चा सहारा घेत तर कोणी मॉर्निंग वॉकला जातं.

तसेच जिम करणे,योग्य आहार घेणे,रोज वर्कआऊट वाढवणे,जंक फूड बंद करणे अशा किती तरी प्रकारे लोक वजन कमी करायचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकला फिट राहण्याची इच्छा असते.त्यामुळे हे सर्व प्रकार करत असतात तर त्या weight loss प्रवासात काही हेल्दी लक्षणे दिसून येतात त्याविषयी माहिती बघू.

Weight loss Journey
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी खा 'हा' स्नॅक्स; मिळेल आठवड्याभरात फरक, हृदयही राहिल निरोगी !

1. उत्साही वाटणे

Weight loss करणे म्हणजे जेवण कमी खाणे किंवा एकवेळ चे जेवण बंद करणे असे होत नाही. प्रोटीन,फायबर, व्हिटॅमिन, मिनिर्लस मिळणाऱ्या पदार्थचा आहारात समावेश केला पाहिजेत. त्याने शरीरात योग्य घटक जातात त्यामुळे वजन कमी होते.जर तुम्ही योग्य आहार घेत असला तर तुम्हाला सारखी भूक लागणार नाही आणि उत्साही वाटत असते.

2. बॉडीशेपमध्ये बदल

योग्य आहार (Diet),वर्कआऊट (Workout) करून वजन कमी होते आणि नकळत बॉडीशेपमध्ये फरक दिसू लागते. लेग्स, आम्स, बेली फॅट कमी झालेले दिसून येते म्हणजेच तुमचे शरीर पूर्वीपेक्षा फिट,स्लिम आणि हेल्दी दिसते याचा अर्थ तुमचे वजन कमी झालेले आहे.

Weight loss Journey
Weight loss Journey canva

3. केसांमध्ये बदल

तुम्हालाही केसांच्या (Hair) वेगवेगळ्या समस्या असतील.केस गळती,कोंडा,केसांची वाढ थांबणे. वजन कमी कण्यासाठी आपण योग्य आहार अगदी प्रमाणात घेत असतो त्यामुळे केसांसाठी आवश्यक तत्वे शरीरात जात असतात म्हणून केसांची वाढ होते आणि केस गळणे नाहीसे होते.

4. Weight loss साठी काही खास टिप्स

  • तेलकट पदार्थचे सेवन टाळा

  • सकाळच्या नाश्त्यात ज्वारीची भाकरच्या आहारात समावेश करा

  • सिझनल फळे आणि भाज्याचे सेवन

  • सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्या

  • थंड पाणी पिऊ नका कोमट पाणी पिले पहिज.

  • पांढरे पदार्थचे सेवन टाळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com