Atal Pension Yojana : फक्त दिवसाला 7 रुपये वाचवा महिन्याला पेन्शन मिळवा; जाणून घ्या, कसा घेता येईल लाभ

जनतेचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत.
Atal Pension Yojana
Atal Pension Yojana Saam Tv

Atal Pension Yojana : रिटायरमेन्टनंतर आपल्या उरलेल्या आयुष्य सुरळीत जावे यासाठी अनेक जण गुंतवणूक करतात. परंतु, योग्य गुंतवणूक न केल्यास आपल्या पुढे जाऊन अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी सरकार वेळोवेळी आपल्यासाठी काही योजनांची माहिती देत असते.

जनतेचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. यापैकी एक म्हणजे अटल पेन्शन (Pension) योजना, जी गुंतवणूकदारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करते. ही सरकारच्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत दरमहा 5000 रुपये पेन्शन घेता येते. १८ ते ४० वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

Atal Pension Yojana
Gratuity and Pension : कामात दिरंगाई केल्यास कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळणार नाही; मोदी सरकारचा नवा नियम

अटल पेन्शन योजना (Scheme) ही एक जोखीममुक्त योजना आहे, ज्यामध्ये सरकारचेही योगदान आहे. अटल पेन्शन योजना PFRDA द्वारे चालवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश नागरिकांचे रोग आणि अपघातापासून संरक्षण करणे हा असून ही योजना प्रामुख्याने देशातील असंघटित क्षेत्रासाठी सुरू करण्यात आली आहे.

अटल पेन्शन योजनेअंतर्गत यासाठी कोण पात्र आहे

सरकारच्या या पेन्शन योजनेअंतर्गत करदात्यांना 1 ऑक्टोबर 2022 पासून गुंतवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे आणि आता या व्यतिरिक्त 18 ते 40 वर्षांचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो. तसेच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे बचत खाते किंवा पोस्ट ऑफिस खाते असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ कसा घ्यावा

  • अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेअंतर्गत तुमचे खाते उघडू शकता.

  • जर तुम्हाला या योजनेत ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • प्रथम PRAN साठी अर्ज करावा लागेल, जो NPS अंतर्गत नोंदणी आहे आणि नंतर अटल पेन्शन योजनेअंतर्गत फॉर्म भरा.

  • यानंतर तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता.

Atal Pension Yojana
Atal Pension Yojana Canva

5000 रुपये पेन्शन कसे मिळेल

  • जर तुम्हाला या योजनेच्या लाभ घ्यायचा झाला तर तुम्हाला मासिक, त्रैमासिक आणि सहामाही योगदान द्यावे लागेल.

  • या योजनेअंतर्गत 1 हजार ते 5000 रुपयांपर्यंतची पेन्शन रक्कम दिली जाते.

  • समजा, जर एखादी व्यक्ती वयाच्या १८ व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सामील झाली आणि दर महिन्याला 210 रुपये म्हणजेच दररोज 7 रुपये गुंतवले तर त्याला निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळतील.

  • त्याच वेळी, तिमाहीत 626 रुपये आणि सहामाहीत 1239 रुपये गुंतवावे लागतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com