ऑनलाइन शॉपिंग करताय तर या गोष्टींची खरेदी करणे टाळा !

हल्ली ऑनलाइन शॉपिंगच्या नवनवीन साइट्स आपल्याला पाहायला मिळतात.
Online shopping side effect
Online shopping side effectब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्याच्या काळात ऑनलाइन शॉपिंग हे एक ट्रेंड बनत आहे. हल्ली ऑनलाइन शॉपिंगच्या नवनवीन साइट्स आपल्याला पाहायला मिळतात. घरी बसून हवी ती वस्तू सहज मागवता येते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगचे क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

हे देखील पहा -

ऑनलाइन (Online) शॉपिंग करताना आपल्या अनेक ऑफर मिळतात किंवा काही प्रमाणात हव्या असणाऱ्या उत्पादनाच्या किंमतीत सूट मिळते. त्यामुळे वेळेची आणि पैशांची बचत यासाठी ऑनलाइन शॉपिंग हा पर्याय चांगला आहे. ऑनलाइन शॉपिंगचे इतरही अनेक फायदे जरी असले तरी ऑनलाइन शॉपिंगवर (Shopping) कोणते उत्पादन खरेदी करु नये हे पाहूया.

या उत्पादनांची ऑनलाइन खरेदी करु नका -

१. घरगुती सामानांवर आपल्याला अधिक सूट मिळते. परंतु, मोठ्या आकाराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी करु नका. मोठ्या उत्पादनावर आपल्याला बऱ्याचदा शिंपिंग चार्जेस द्यावे लागते. उत्पादन खरेदी केल्यानंतर त्याची रिटन पॉलिसीसाठी अधिक वेळ लागते.

Online shopping side effect
केसांनुसार हेअर ब्रश निवडताना या टिप्स फॉलो करा

२. आपल्याला आवडणारे परफ्युम हे ऑनलाइन साइट्सवर बऱ्याचदा सवलतीत मिळतात त्यामुळे आपण ते खरेदी करतो. परंतु, अधिकतर परफ्युमच्या ब्रॅन्डवर व त्याच्या सुवासावर भर दिला जातो. अशावेळी आपण परफ्युम शॉपमधून खरेदी करायला हवा.

३. आपले सौंदर्य जपण्यासाठी आपण अनेक ब्युटी उत्पादने खरेदी करत असतो. त्यातच अधिकभर म्हणून ऑनलाइन साइट्सवर या उत्पादनांवर आपल्याला सवलती मिळतात. पण आपल्या हे लक्षात असायला हवे की, या ब्युटी उत्पादनांचा थेट संपर्क आपल्या त्वचेशी येतो. काही वेळेस आपण ऑर्डर केल्यानंतर आपल्याला डेट गेलेले उत्पादने मिळतात या गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्या त्वचेवर त्याचा दुष्परिणाम होऊ लागतो.

४. बेडशीट किंवा गाद्या या ऑनलाइन खरेदी करु नका. याचा थेट संपर्क आपल्या झोपेशी व आरोग्याशी येतो त्यामुळे याची ऑफलाइन खरेदी करावी. बेडशीट किंवा गाद्या खरेदी करताना त्याची उंची व खोली, त्याच्या आतील कापूस कोणता आहे हे तपासा .

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com