Ayurvedic Tips : सावधान ! साखरेऐवजी गुळाचा चहा पिताय ? तर, त्याआधी 'हे' जाणून घ्या

फिटनेस प्रेमी साखरेच्या जागी गूळ आणि मधासारख्या नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करत आहेत.
Ayurvedic Tips
Ayurvedic TipsSaam Tv

Ayurvedic Tips : हल्ली प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. कुणी साखरेचा चहा पित तर कुणी गुळाचा. साखरेपेक्षा गुळ हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. साखरवर अनेक प्रक्रिया करुन तिला तयार केली जाते.

आजकाल निरोगी राहणे हा प्रत्येकाचा मंत्र बनला आहे. फिट राहण्यासाठी लोक जिमपासून डान्स क्लासेसमध्ये सहभागी होत आहेत. यासोबतच लोक आपल्या आहाराचीही खूप काळजी घेत आहेत. फिटनेस प्रेमी साखरेच्या जागी गूळ आणि मधासारख्या नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करत आहेत. हल्ली बाजारात किंवा रस्त्यावरच्या टप्परीवर देखील गुळाचा,मधाचा चहा प्यायला मिळतो. अनेकांना आपल्या दिवसाची सुरुवात गुळाच्या गोड चहाने करायला आवडते. जर अनेक अहवालांवर विश्वास ठेवायचा असेल तर चहामध्ये साखरेऐवजी गूळ हा एक आरोग्यदायी पर्याय आहे पण आयुर्वेदावर विश्वास ठेवायचा असेल तर हे हानिकारक आहे. जाणून घेऊया त्याचे योग्य कारण

Ayurvedic Tips
Ayurvedic Tips : बहुगुणी आहे 'ही' वनस्पती, त्वचेच्या समस्यांवर तर रामबाण उपाय !

दुधासोबत (Milk) गूळ घेणे हानिकारक

आयुर्वेदानुसार विरुध्दहार किंवा चुकीचे अन्नपदार्थ आपल्या शरीरात कचरा तयार करतात. ज्यामुळे त्याचा पचनशक्तीवर परिणाम होतो. गुळाचे असंख्य फायदे जरी असले तरी त्यात जीवनसत्त्वे, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात, आणि हे दुधासोबत एकत्रित केल्याने शरीराला हानिकारक ठरू शकते.

काय म्हणतात आयुर्वेद तज्ज्ञ

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ रेखा राधामणी यांच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, अन्नपदार्थांच्या चुकीच्या मिश्रणामुळे आपल्या शरीरात विष तयार होऊ शकते. आयुर्वेदात, प्रत्येक अन्नाची स्वतःची वेगळी गुणवत्ता, चव, सामर्थ्य, पचनोत्तर प्रभाव असतो. दूध थंड आणि गूळ गरम आहे आणि जेव्हा तुम्ही गरम ऊर्जायुक्त अन्न किंवा 'उष्ण विर्या' शीत ऊर्जायुक्त अन्नामध्ये मिसळता तेव्हा वीर्यमधील फरकामुळे मिसमॅच होते. त्यामुळे आपल्या पित्त किंवा आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

चहामध्ये साखरेऐवजी काय घालावे ते जाणून घ्या

जे लोक त्यांच्या चहासाठी निरोगी आणि नैसर्गिक गोड पदार्थ शोधत असाल त्यांच्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ साखर कँडी किंवा रॉक शुगरचा पर्याय सुचवतात, कारण साखर कँडी दुधाइतकी थंड असते आणि वीर्याशी कोणताही संघर्ष होत नाही.

आयुर्वेदानुसार चुकीचे खाद्यपदार्थ

चुकीच्या खाद्यपदार्थांमुळे जळजळ, त्वचेची जळजळ ते स्वयंप्रतिकार रोगांपर्यंत विविध प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदानुसार, हे फूड कॉम्बिनेशन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

  • केळी (Banana) आणि दूध

  • दूध आणि मासे

  • दही आणि चीज

  • मध आणि तूप

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com