Ayushman Bhav Abhiyan: आयुष्मान भव अभियान योजना काय आहे? मोफत हेल्थ चेकअप कसे कराल?

Ayushman Bhav Campaign : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्मान भव योजनेचा शुभारंभ करणार आहेत.
Ayushman Bhav Abhiyan
Ayushman Bhav AbhiyanSaam Tv

आयुष्मान भव अभियान योजना (Government Health Scheme) :

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्मान भव योजनेचा शुभारंभ करणार आहेत. हा एक देशव्यापी उपक्रम आहे ज्याचा उद्देश प्रत्येक गाव आणि शहरात आरोग्य सेवा प्रदान करणे आहे.

खरं तर, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशव्यापी आरोग्य मोहीम राबविण्यात येणार आहे, ज्या अंतर्गत आरोग्य (Health) आणि वेलनेस सेंटरवर आयुष्मान शिबीर आयोजित केले जातील आणि लोकांची आरोग्य तपासणी केली जाईल. याशिवाय अनेक जनजागृती कार्यक्रम जसे रक्तदान आणि अवयवदान मोहीमही राबविण्यात येणार आहे.

Ayushman Bhav Abhiyan
Ayushman Bharat Scheme : आयुष्मान भारत योजना काय आहे? कार्ड असून लाभ घेता येत नाही? कशी कराल तक्रार

60 हजार लोकांना आयुष्मान भारत कार्ड देण्यात येणार आहे

आयुष्मान भव योजनेंतर्गत 60 हजार गरीब लोकांना आयुष्मान भारत कार्ड दिले जाणार असून त्याअंतर्गत त्यांना वार्षिक 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. या मोहिमे अंतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून आरोग्य व वेलनेस सेंटर उघडण्यात येणार असून तेथे लोकांची मोफत तपासणी केली जाणार आहे.

मेडिकल कॉलेज आणि ब्लॉकमध्ये आरोग्य शिबिरे लावली जाणार आहेत

या अभियानांतर्गत केवळ गरिबांसाठीच नाही तर मध्यमवर्गीयांसाठीही आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या कालावधीत सर्व जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि ब्लॉकमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, जेथे लोकांची मोफत चेकअप केले जाईल. याशिवाय या कार्डप्रमाणे मोफत (Free) उपचारही केले जाणार आहेत. याशिवाय या मोहिमेअंतर्गत लोकांना आजार आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबाबत जागरूक केले जाणार आहे.

मनसुख मांडविया यांनी तयारीचा आढावा घेतला

मनसुख मांडविया यांनीही या मोहिमेची तयारी कशी आहे, याचा आढावा घेतला आहे. त्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्‍यांशी सर्व तयारींबद्दल चर्चा केली. आयुष्मान भारत योजना (Yojana) हा भारत सरकारचा आरोग्याबाबतचा एक मोठा उपक्रम आहे, ज्याद्वारे खेडोपाडी आणि शहरांमध्ये आरोग्य सेवा पुरविण्याची तयारी केली जात आहे. जेणेकरून प्रत्येक भारतीय निरोगी राहील आणि भारताच्या विकासात आपली भूमिका बजावू शकेल.

Ayushman Bhav Abhiyan
Ayushman Bhava Yojana: सांगलीत ४६ बालकांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com