Health Benefits To Wearing Bangles : बांगड्या केवळ सौंदर्याचे अलंकार नाही, तर आरोग्यासाठीही आहेत फायदेशीर !

Health Benefits : हल्ली बऱ्याच बायकांच्या हातात बांगड्या दिसत नाहीत पण केवळ सणासमारंभाला बायका सजण्या सवरणायाठी बांगड्या आवर्जून घालतात.
Health Benefits To Wearing Bangles
Health Benefits To Wearing BanglesSaam Tv

Health Benefits To Wearing Bangles : भारतीय संस्कृतीमध्ये बायका फार पूर्वीपासून हातात बांगड्या घालत आहे. मात्र हल्ली बऱ्याच बायकांच्या हातात बांगड्या दिसत नाहीत पण केवळ सणासमारंभाला बायका सजण्या सवरणायाठी बांगड्या आवर्जून घालतात.

मग ते सोन्या-चांदीच्या बांगड्या असतो किंवा काचेच्या बांगड्या असो. बांगड्याशिवाय शृंगार पूर्ण होत नाही त्यामुळे सणावारात बांगड्याना विशेष महत्त्व दिले जाते. पण बांगड्या केवळ सौंदर्याच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया बांगड्या घालण्याचे आरोग्याला होणारे फायदे

Health Benefits To Wearing Bangles
Yoga Benefits For Chin : हा योगा करा आणि डबल चीनपासून सुटका मिळवा!

1. बांगडीच्या धातूमुळे फरक पडतो

बांगडी कोणत्याही धातूपासून बनली असली तरी बांगडीचा आरोग्याशी संबंध येतो. सोन्या चांदीच्या बांगड्या घालणाऱ्या स्त्रियांच्या (Women) आरोग्यावर (Health) चांगला परिणाम होतो. त्यासोबतच आजूबाजूच्या वातावरणाचा देखील परिणाम होत असतो. तसेच हातात बांगडीच्या घालण्याचे शास्त्रीय कारण देखील आहे.

2. हातात बांगड्या घालण्याचे आरोग्याला होणारे फायदे

पूर्वीच्या काळात सोने (Gold) आणि चांदीच्या बांगड्या घातल्या जात होत्या. सोन्या- चांदीच्या बांगड्या घातल्याने शरीर सोन्या- चांदीच्या संपर्कात येते आणि धातूंचे गुणधर्म शरीराला मिळते. परिणामी महिलांना शक्ती मिळते. बांगड्या काचेच्या जरी असल्या तरी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits) आहे. बांगड्या घातल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो, थकवा जाणवत नाही, शरीरातील उष्णता कमी होते, हार्मोन्स संतुलित राहणे इत्यादी फायदे आरोग्याला होतात.

Health Benefits To Wearing Bangles
Coriander Water Benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या धण्याचे पाणी, होतील अनेक फायदे !

3. आयुर्वेदानुसार आणि वैज्ञानिक दृष्टीने

  • आयुर्वेदानुसार सोन्या-चांदीचे बांगड्या घातल्याने स्त्रीच्या शरीरात घर्षण होते.

  • ज्यामुळे महिलांचे शरीर मजबूत रहाण्यास मदत होते आणि इतर आरोग्यासंबधित फायदे देखील होतात.

  • तर वैज्ञानिक दृष्टीने मनगटापासून सुमारे ६ इंचापर्यंत अनेक एक्यूप्रेशर पॉइंट्स आहेत ज्यामुळे हातात बांगड्या घातल्याने त्यावर दबाव येते आणि शरीरातील थकवा दूर होतो.

  • परिणामी ऊर्जा शिल्लक राहते. हातात बांगड्या घातल्याने एक्यूप्रेशर पॉइंट्समधील ६ पॉइंट्सवर दबाव येतो ज्याने हृदय आणि श्वसनाचे आजार दूर राहतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com