Mega Auction : बँक ऑफ इंडियाचे मेगा ऑक्शन ; स्वस्तात घर खरेदी करण्याची नवी संधी, आजच पहा

बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी ९ डिसेंबर रोजी एक मेगा ई-ऑक्शन आणत आहे.
Mega Auction
Mega Auction Saam Tv

Mega Auction : बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी ९ डिसेंबर रोजी एक मेगा ई-ऑक्शन आणत आहे, ज्यामध्ये त्यांना स्वस्तात मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

स्वत:चं घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि कमी पैशात हे स्वप्न पूर्ण झालं तर काय हरकत आहे? होय, बँक ऑफ इंडिया स्वस्तात घर, दुकान, मालमत्ता आदी खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकते. यासाठी बँक ९ डिसेंबर २०२२ रोजी मेगा ई-ऑक्शन घेणार आहे.(Home)

ज्यामध्ये भारतातील विविध झोनमधील स्थावर मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. या मेगा ई-ऑक्शनमध्ये (Auction) सहभागी होऊन अत्यंत माफक दरात आपली मालमत्ता घेण्याचे स्वप्न ग्राहक पूर्ण करू शकतात.

Mega Auction
5G Spectrum Auction 2022 : 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव पाचव्या दिवशी सुरूच, पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

लिलाव कधी?

बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून या मेगा ई-ऑक्शनची माहिती दिली. बँक ऑफ इंडियाचा हा मेगा ई-लिलाव ९ डिसेंबरला होणार आहे.

बँक म्हणाली, 'मेगा ई-ऑक्शन! परवडणाऱ्या किमतीत उत्तम प्रॉपर्टी! मालमत्तेच्या तपशीलासाठी, भेट द्या - https://ibapi.in/Sale_Info_Home.aspx आणि https://bankofindia.co.in/Dynamic/Tender?Type=3"

Mega Auction
Auction of Steve Jobs Job application | स्टीव्ह जॉब्सच्या नोकरी अर्जाचा लिलाव, पाहा व्हिडिओ

१००० हून अधिक मालमत्तांचा लिलाव होणार -

बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ इंडियाच्या या मेगा ई-ऑक्शनमध्ये २०० हून अधिक मालमत्तांचा लिलाव होणार आहे. यामध्ये ग्राहकांना वर्किंग स्पेस, फ्लॅट/अपार्टमेंट/अपार्टमेंट मिळू शकणार आहे. निवासी घर, रिकामी जागा, व्यावसायिक दुकान, औद्योगिक जमीन / इमारती वगैरे खरेदी करण्याची संधी मिळेल.

बँक ऑफ इंडियाच्या मेगा ई-ऑक्शनमध्ये ग्राहकांना बेंगळुरु, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई यासारख्या शहरांमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लोक घरी बसल्या कमी किंमतीत या मालमत्तांसाठी ऑनलाइन बोली लावू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com