Bathing Specific Rules: आंघोळ करताना करू नका ही मोठी चूक; अन्यथा खीसा होईल रिकामा

Bathing Rules In The Scriptures: अशात आज आपण कपडे न घालता आंघोळ करणे शास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ हे जाणून घेऊ.
Bathing Specific Rules
Bathing Specific RulesSaam TV

Rules Of Bath: हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला काही ना काही शास्त्रीय कारण दिलं आहे. अशात आपल्या घरी आपल्याला बसण्यापासून ते खाण्यापिण्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी टोकले जाते. सायंकाळी केर काढूनये, रात्रीची नखे कापूनये असं अनेकदा सांगितलं जातं. तसेच आंघोळ करतानाही काही नियमांचे पालन करण्यास सांगितले जाते. बऱ्याच तरुण मंडळींचे यावरून कुटुंबीयांसह वादही होतात. अशात आज आपण कपडे न घालता आंघोळ करणे शास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ हे जाणून घेऊ. (Latest Marathi News)

ज्योतिष आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी विवस्त्रपणे आंघोळ करण्याला शास्त्रात काय म्हटलं आहे हे सांगितलंय. त्यांनी श्री कृष्णाच्या एका घटनेची आठवण करुन देत म्हटलं आहे की, गोपीका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या. त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते. हे कपडे चोरल्यावर गोपीका फार हताश झाल्या. त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली.

Bathing Specific Rules
Tiger - Deer Hunting Video: खरंच ना भावा! वाघाची शिकार हरणीने केली; सत्य घटनेचा VIDEO व्हायरल

गोपीकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते. तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की, कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केले पाहिजे. असे केल्याने आपण जल देवता वरुण यांचा अपमान करतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद घोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करुनये.

नकारात्मक ऊर्जेचा होईल शिरकाव

पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी यात पुढे म्हटलं आहे की, विवस्त्र आंघोळ केल्याने तुमच्याकडे नकारात्मक उर्जा येते. याने जवळ पैसे टिकत नाही. तसेच व्यक्ती सतत तोट्यात राहतो.

Bathing Specific Rules
Perfect Time To Sleep: रात्री १० वाजताच झोपा; शरीराला मिळतील जबरद्स्त फायदे

पितृदोष असण्याची शक्यता

गरुड पुराणानुसार, विवस्त्र आंघोळ (Bath) केल्याने त्या व्यक्तीला पितृदोष लागण्याची शक्यता असते. अनेकदा तुमचे पूर्वज तुमच्या आजुबाजूलाच असतात. असे केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. त्यामुळे आंघोळ करताना कधीही विवस्त्र होऊ नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com