Side effects of cheese : चीजचे सेवन करताय तर त्याच्या दूष्परिणामाविषयी देखील जाणून घ्या

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दूग्धजन्य पदार्थांचे सेवन करायला अधिक आवडते.
Side effects of cheese
Side effects of cheeseब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दूग्धजन्य पदार्थांचे सेवन करायला अधिक आवडते. यात असणारे घटक शरीराला पोषक तत्व प्राप्त करुन देतात.

हे देखील पहा -

फिटनेससाठी किंवा वजन वाढवण्यासाठी बरेच लोक चीजचे सेवन करतात. कुठल्याही पदार्थावर चीज किसून घातले की, त्याची चव वाढते. हल्ली बर्गर, पिझ्झा, सॅण्डविच यांसारख्या अनेक पदार्थांवर चीजचा वापर केला जाते. बऱ्याच लोकांना चीज खाल्ल्याशिवाय जमत नाही परंतु, चीजचे अतिसेवन केल्यास हृदयरोज व अतिप्रमाणात वजन वाढू शकते. तसेच चीजचे अतिसेवन केल्यास त्याचा कसा दुष्परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.

१. चीज हे नैसर्गिकरित्या न बनवलेला पदार्थ आहे. दुधावर विशेष प्रक्रिया करुन ते बनवले जाते. त्यातून तयार होणारे बोवाइन ग्रोश हार्मोन आपल्या आरोग्यासाठी अधिक घातक असते व त्याचा परिणाम हा दीर्घकाळ असू शकतो.

Side effects of cheese
Benefits of Banana : दिवसभराच्या ऊर्जेसाठी रोज एक केळी ठरेल फायदेशीर

२. पुरेसे पाणी (Water) न पिल्यास शरीर डिहायड्रेट होऊ शकते. परंतु, जास्त प्रमाणात सोडियमयुक्त पदार्थ, क्रीमी कॅसरोल किंवा चीजबर्गरचे सेवन अधिक हानिकारक असू शकते. चीज हे उच्च सोडियम असलेला अन्नपदार्थ आहे. एकाच वेळी जास्त प्रमाणात ते खाल्ल्याने आरोग्याला (Health) घातक ठरु शकते.

३. भरपूर चीजचे सेवन केल्याने शरीरातील लॅक्टोज आतड्यात प्रक्रिया करुन शोषले जाते व त्यामुळे अपचनाची समस्या निर्माण होते.

४. चीजमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. चीजसोबत सॅच्युरेटेड पदार्थ घेतल्याने ते घातक ठरणार नाही. निरोगी आहारासाठी व हृदयाच्या रक्तवाहिन्यासंबंधित आरोग्यास चालना देण्यासाठी चीज खाणे टाळावे.

५. आपल्यापैकी बरेच लोक चीजला लो-कार्ब किंवा हाय प्रोटीन पदार्थ मानले जातात. त्यासाठी त्याला सलाद, सॅण्डविचमध्ये घातले जाते. परंतु, वजन कमी करण्यासाठी चीज चा आहारात समावेश करत असाल तर ते अधिक वाढू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com