दीर्घकाळ पनीर टिकवण्यासाठी हे उपाय नक्की करा.

पनीर ताजे ठेवण्यासाठी आणि त्याचा मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टी करा.
How to preserve panner
How to preserve pannerब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हल्ली सुपर मार्केटमधे दुग्धजन्य पदार्थांवर (Food) बऱ्याचदा अधिक सूट मिळते. त्यामुळे आपण दुग्धजन्य पदार्थ विकत घेतो. त्यात प्रामुख्याने विकत घेतला जाणारा पदार्थ पनीर. आजकाल पनीर घरी देखील बनवले जाते. भाजीपाल्याशिवाय इतर अनेक पदार्थात पनीरचा वापर आपण करतो. पदार्थाची चव वाढवण्यासाठी पनीर हे ताजे लागते. पनीर हा आपल्या आहारातील महत्त्वाचा भाग असून ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक घरांमध्ये पनीर साठवले जाते, पण ते लवकर खराब होत असल्याच्या तक्रारी देखील आहेत. परंतु, पनीर अधिक काळ साठवता येत नाही. पनीर दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब करुन आपण ते टिकवू शकतो. पनीर ताजे ठेवण्यासाठी व टिकवण्यासाठी आम्ही काही टिप्स (Tips) तुम्हाला देणार आहोत.

हे देखील पहा -

अशाप्रकारे आपण पनीर अधिक काळ टिकवा.

१. मिठाच्या पाण्यात पनीर आठवडाभर साठवता येते. पनीर साठवण्यासाठी एका भांड्यांत चमचाभर मीठ व पुरेसे पाणी (Water) घाला. चमच्या च्या मदतीने ते पाण्यात विरघळवून घ्या. या पाण्यात पनीर पूर्णपणे बुडलेले असेल याची खात्री करा. त्यानंतर भांडे झाकून ठेवा. पनीर साठवताना दर दोन दिवसांनी पाणी बदलत रहा. असे केल्यास पनीर एका आठवड्यापेक्षा जास्त काळ साठवता येईल.

२. पनीर साठवण्याचा दुसरा पर्याय म्हणजे झिप बॅग वापरणे. याच्या आधारे आपण पनीर महिनाभर साठवू शकतो. या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी, पनीरचे तुकडे करुन ते ट्रेमध्ये घेवून फ्रीजरमध्ये ठेवा. पनीरचे तुकडे बर्फासारखे कडक झाल्यावर झिप बॅगमध्ये ठेवा त्यानंतर ही झिप बॅग फ्रीजरमध्ये ठेवा. ज्यावेळी पनीर वापरायचे असेल तेव्हा झिप बॅगमधून पनीरचे तुकडे काढून कोमट पाण्यात काही वेळ ठेवा. पनीर पूर्वीसारखे मऊ आणि ताजे असेल.

How to preserve panner
पांढऱ्या कपडयांची चमक टिकवायची आहे तर, अशी घ्या काळजी

३. पनीर जास्त काळ साठवायचे नसेल, पण पनीर अधिक काळ टिकवता त्याचा ताजेपणा २ ते ३ दिवस टिकवून ठेवायचा असेल, तर आपण यासाठी साधे पाणी वापरू शकतो. एका भांड्यात साधे पाणी भरुन. त्यात पनीर टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा. पनीर पाण्यात घालताना लक्षात ठेवा की ते पूर्णपणे बुडलेले असेल. जर पनीर पूर्णपणे पाण्यात बुडवलेले नसेल तर त्याची चव कडूबरोबरच आंबटही लागते. त्यामुळे त्याची चव खराब होऊ शकते.

४. पनीर ताजे ठेवण्यासाठी आणि त्याचा मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी, मलमल किंवा सुती कापडाचा वापर आपण करु शकतो. मलमल किंवा सुती कापड हलके ओले करुन कपड्यातील सर्व पाणी पिळून घ्या. आता या कपड्यात पनीरचे तुकडे घालून सर्व बाजूंनी दुमडून फ्रीजमध्ये ठेवा. अशा प्रकारे पनीर ताजे राहील. कापड सुकल्यानंतर पुन्हा ओला करुन त्यात पनीर ठेवा.

अशाप्रकारे आपण पनीर अधिक काळ टिकवू शकतो.

डिस्क्लेमर: आहारात पनीरचा समावेश करताना कृपया आपल्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com