त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकरला श्रृंगार...!
त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकरला श्रृंगार...!रोहिदास गाडगे

त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकरला श्रृंगार...!

त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर देवदेवतांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दीपोत्सव साजरा केला होता आणि तीच परंपरा आजही पाहायला मिळत आहे.

पुणे: दिवाळी नंतरही ज्या दिवशी घरो- घरी दिपोत्सव साजरा केला जातो तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पोर्णिमा. त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर देवदेवतांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दीपोत्सव साजरा केला होता आणि तीच परंपरा आजही पाहायला मिळत आहे. आज त्रिपुरारी पोर्णिमेच्या निमित्ताने भीमाशंकरला शिवलिंगाला श्रृंगार करत रांगोळीने सजविण्यात आले यावेळी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली. (beautiful lighting for Shri Kshetra Bhimashankar on the occasion of Tripurari Purnima)

हे देखील पहा -

भगवान शंकराने आजच्या दिवशी तारकासुराच्या तिन्ही पुत्रांचा म्हणजे त्रिपुरांचा बीमोड केला होता. असुर शक्तीचा नाश झाल्यामुळे देव-देवतांनी भीमाशंकरला दीपोत्सव केला होता. हीच परंपरा आजही तशीच सुरु आहे, या मंदीरात देशभरातुन अनेक भाविक पंडीतांनी हजेरी लावली आहे.

त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकरला श्रृंगार...!
Alibag : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त चौल रामेश्वर मंदिर उजळले रोषणाईने!

त्रिपुरारी पोर्णिमा तर एक निमित्त आहे, मात्र प्रकाशाला नेहमीच जगण्याची ऊर्जा देणारा स्त्रोत मानल जातं, त्याचबरोबर वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीने केलेली मात हेही ह्या दीपोत्सवा मागचं गमक आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com