इंटीमेट होण्याआधी स्वतःला अन् तुमच्या जोडीदाराला विचारा 'हे' 6 प्रश्न...

एखाद्याशी इंटिमेट होणं हा कोणत्याही व्यक्तीसाठी एक मोठा निर्णय आहे. अनेकदा एखाद्याशी जवळीक साधल्यानंतर लोकांना पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे कोणाशीही जवळीक साधण्यापूर्वी तुम्ही स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला काही प्रश्न विचारले पाहिजेत जेणे करून तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
इंटीमेट होण्याआधी स्वतःला अन् तुमच्या जोडीदाराला विचारा 'हे' 6 प्रश्न...
RelationSaam Tv

आजकाल चित्रपट वगैरेंमध्ये कोणत्याही प्रकारे इंटेमसी (Intimacy) दाखवली जात असली तरी, सामान्य जीवनात, एखाद्याशी इंटिमेट असणे म्हणजे केवळ शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित करणे एवढेच नव्हे, तर या काळात ती एखाद्या व्यक्तीशी मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही आपण जोडले जात असतो. कोणत्याही व्यक्तीसाठी इंटिमेट होणे ही खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे अशा परिस्थितीत, हे महत्वाचे आहे की आपण जर इंटिमेट होणार आहात, तर आपण स्वत: ला आणि आपल्या जोडीदाराला काही प्रश्न विचारले पाहिजेत. ते प्रश्न काय आहेत ते जाणून घेऊया-

स्वतःला विचारा हे प्रश्न-

हीच ती योग्य वेळ आहे ?

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी इंटीमेट होता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या भावनिकदृष्ट्या जवळ येऊ लागता. जर कोणाशी तुम्हाला भविष्यात क्लोज यायचे नसेल तर त्याच्याशी इंटीमेट होणे टाळा. समोरच्या व्यक्तीसोबत इंटीमेट होण्याआधी त्या व्यक्तीला समजून घेणं खूप गरजेचं आहे. अनेक वेळा समोरच्या व्यक्तीसोबत नकळत जवळीक साधली जाते, जी भविष्यासाठी खूप कठीण होऊन बसते. अनेकवेळा शारीरिक संबंध बनवल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या जवळ राहणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे सर्व पुढचा विचार करूनच समोरच्या व्यक्तीसोबत इंटीमेट व्हा.

ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे का?

कोणाशीही इंटीमेट होण्यापूर्वी, ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे का हे तुम्ही स्वतःला विचारणे महत्त्वाचे आहे. अनेकवेळा स्त्रिया केवळ पुरुषांचे लुक्स पाहूनच त्याच्याशी इंटिमेट होण्याचा निर्णय घेतात, परंतु कदाचित दिसण्यात आकर्षक दिसणार्‍या व्यक्तीमध्ये अशा काही सवयी असू शकतात ज्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. जसे की, कदाचित ती व्यक्ती नंतर तुमच्याशी वाईट वागू शकते किंवा ती व्यक्ती इतरांबद्दल असंवेदनशील असू शकते, त्या व्यक्तीचा स्वभाव रागीट असू शकतो किंवा त्या व्यक्तीला दारूचे व्यसनही असू शकते.

इंटीमेट झाल्याने तुम्हाला काही काळासाठी आनंद नक्की मिळू शकतो, परंतु अशा वाईट सवाई असणाऱ्या व्यक्तीशी जवळीक साधल्याने तुम्हाला नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे जर तुम्हाला पश्चात्ताप होऊ नये असे वाटत असेल, तर कोणाशी जवळीक साधण्यापूर्वी ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे निश्चितपणे स्वतःला एकदा विचारा.

हे लैंगिक संबंध माझ्या कोअर व्हॅल्यूएससोबत जुळतात का?

कोणाशीही इंटिमेट होण्यापूर्वी, हे सर्व तुमच्या नीतिमत्ता आणि मूल्यांनुसार आहे की नाही हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. तसेच, तुमचा पार्टनर दुसऱ्या कोणाच्या तरी संबंधात तर नाही ना याची खात्री करून घ्या. जर असे काही असेल तर त्याच्याशी इंटिमेट होण्यापासून स्वतःला थांबवा. एखाद्याशी जवळीक साधण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मूल्यांकडे, तत्वाकडे दुर्लक्ष कराल. तुम्ही कधीच कोणासाठीही तुमच्या मूल्यांशी कधीच तडजोड करू नका.

हे प्रश्न तुमच्या जोडीदाराला विचारा;

आपण एकमेकांसाठी काय आहोत?

कोणाशी तरी इंटिमेट होण्याआधी तुमच्या दोघांची विचारसरणी सारखी आहे की नाही हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला थेट विचारू शकता की तो अविवाहित आहे की इतर कोणासोबत तरी रिलेशनमध्ये आहे. समोरच्या व्यक्तीसोबत इंटिमेट होण्याआधी ही गोष्ट काळजीपूर्वक निश्चित करून घ्या अन्यथा आयुष्यात पश्चातापाशिवाय काहीही उरणार नाही.

STD आणि HIV टेस्ट तुम्ही कधी केली होती का विचारा?

कदाचित हा प्रश्न तुमहाला थोडा विचित्र वाटू शकतो, परंतु शारीरिक आरोग्यासंबंधीचा धोका टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याची एसटीआय आणि एचआयव्ही चाचणी कधी केली होती हे विचारणे महत्त्वाचे आहे. जर सर्व काही ठीक असेल तर आपण नातेसंबंधात पुढे जाण्याचा विचार करू शकता.

बर्थ कंट्रोलसाठी तुम्ही कशाचा वापर करणार?

इंटिमेट होताना लक्षात ठेवा की नंतर तुम्हाला अनवॉन्टेड प्रेग्नन्सी (Unwanted Pregnancy) चा धोका होऊ नये (जर तुम्हाला मूल नको असेल तर). यासाठी तुम्ही दोघांनी हे ठरवले पाहिजे की, यापासून बचाव करण्यासाठी तुमची कशाचा वापर करणार आहात? बहुतेक मुले इंटिमेट होताना प्रोटेक्शनचा वापर करणे टाळतात त्यांना प्रोटेक्शनचा अडथळा नको असतो. पण पुढील धोका टाळण्यासाठी ते वापरणे गरजेचे आहे. यामुळे हे गरजेचे आहे की तुम्ही इंटिमेट होणाच्या आधी तुमच्या पार्टनर ला विचार की ते प्रोटेक्शनचा वापर करणार आहेत की नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.