Wedding Planning Tips : लग्न करण्याआधी जाणून घ्या, 'या' महत्त्वाच्या गोष्टी!

लग्न हे असं नातं असतं ज्यात मुलगा आणि मुलगी त्यांचं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात.
Wedding Planning Tips
Wedding Planning Tips Saam Tv

Wedding Planning Tips : मुलं व मुली दोघांच्या आयुष्यातील लग्न हा असा आनंदी क्षण असतो ज्याची ते आतुरतेने वाट पाहत असतात. एकीकडे नवरी नवे कपडे, अंगठी, डान्स, दागिने, डिनर डेट्स याबद्दल विचार करुन खुश होत असते तर दुसरीकडे लग्न करणा-या मुलाला हा विचार करुन टेन्शन येत असतं की नव्याने येणा-या जबाबदा-या तो व्यवस्थित पूर्ण करु शकेल का? लग्नानंतर सुरुवातीचा काळ गोडगुलाबी प्रेमात सुंदर जातो पण हळू हळू जबाबदा-यांचा ताण दोघांवरही येऊ लागतो.

लग्न हे असं नातं असतं ज्यात मुलगा आणि मुलगी त्यांचं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. त्याचबरोबर मुलगा आणि मुलगीच नाही तर दोन कुटुंब त्याच्या लग्नामुळे एकत्र येतात.त्यामुळे नातेसंबंध जुळत असतात.

Wedding Planning Tips
Pre-wedding Outfits : प्री-वेडिंग शूटसाठी असे आउटफिट्स निवडा, दिसाल आकर्षक

तुमच्या होणाऱ्या जोडीदारा बद्दल माहिती नसेल तर नक्कीच त्याच्याबद्दल जाणून घ्या.आजकाल चे नाते हे सहज मोडतील इतकी नाजुक झालेली आहेत त्यामुळे लग्न करण्याआधी जाणून घ्या या काही गोष्टी

आयुष्यभराचा निर्णय -

आताच्या काळात युवा वर्ग हा प्रत्येक बाबतीत झटकीपट -

निर्णय घेत आहे तसेच ते काही वेळेस लग्नाच्या बाबतीत देखील करतात.त्यामुळे तडकाफडकी घेतलेले निर्णय चुकतात दोघात वाद सुरू होतात आणि नात मोडले जाते.त्यामुळे लग्न करण्यापूर्वी आपण घेत आहोत तो निर्णय योग्य आहे का? त्यामुळे आपल आयुष्य सुखी होईल का?आपण नेहमी खरच खुश राहू का? या सगळ्याचा विचार केला पाहिजे.

Wedding Planning Tips
Wedding Loan : मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेताय ? 'ही' कागदपत्रे अवश्य सोबत ठेवा

करिअर प्लॅन -

लग्न हे भविष्याशी निगडीत नातं आहे. त्यामुळे एकमेकांचे करिअर, नोकरी आदींबद्दलची चर्चा करून क्लिअर करा. ते काय करतात, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यांचा पगार किती? भविष्यातील करिअरबाबत त्यांच्या काय योजना आहेत? याशिवाय तुम्ही नोकरी करत असाल तर हेही जाणून घ्या की त्यांना लग्नानंतर तुमच्या नोकरीबाबत काही अडचण तर नाही ना?

एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ द्या -

प्रेम विवाह असो की अरेंज मॅरेज, तुम्हाला तुमच्या जोडीदाराला जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळाली नाही असे वाटत असेल तर लग्नाचा निर्णय घेणे टाळा. एकमेकांना ओळखणे म्हणजे केवळ उणीवा आणि गुण जाणून घेणे असे नाही. जीवन, भविष्य, नातेसंबंध इत्यादींबद्दल काय विचार करतात हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे वैवाहिक नात्यात येण्यापूर्वी नेहमी एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ काढा.

पसंत आणि नापसंत -

लग्नाआधी आयुष्याच्या जोडीदाराच्या आवडी-निवडीबद्दल थोडं माहिती असायला हवी. शाकाहारी आहेत की मांसाहारी? तुम्ही मद्यपान किंवा धूम्रपान करता का? तुम्हाला ते आवडतं की नाही? याशिवाय त्यांच्या आवडींबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घ्या. यावरून तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाचीही कल्पना येते आणि लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही त्यांना अनोळखी समजणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com