Benefit of Oil Before a Bath : आंघोळीपूर्वी शरीराला तेल का लावले जाते? जाणून घ्या त्याचे फायदे

तेल लावणे हा आपल्या शरीराचे पोषण करण्याचा एक आदर्श मार्ग आहे.
Benefit of Oil Before a Bath
Benefit of Oil Before a BathSaam Tv

Benefit of Oil Before a Bath : वयोमानानुसार आपली त्वचा ही अधिक मृत होत जाते. त्वचेत पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे समस्या उद्भवू लागतात. तेल लावणे हा आपल्या शरीराचे पोषण करण्याचा एक आदर्श मार्ग आहे.

त्वचेला जपण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करतो. अगदी महागातले उत्पादाने देखील वापरतो. त्वचा (Skin) निरोगी व तजेलदार राहण्यासाठी आपण काही घरगुती पदार्थांचा वापर करायला हवा. ज्यामुळे आपली निस्तेज झालेली त्वचा अधिक सुंदर होईल. (Latest Marathi News)

Benefit of Oil Before a Bath
Skin And Hair Care : त्वचा आणि केसांसाठी बहूगुणी सदाफुलीची फुलं

आंघोळीनंतर शरीराला तेल (Oil) लावण्याचे गुणधर्म सर्वांनाच माहिती आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की आंघोळीपूर्वी शरीराला तेल लावल्याने अनेक फायदे होतात. त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा भाग आहे आणि आयुर्वेदानुसार दररोज अभ्यंग किंवा तेल लावण्याची शिफारस केली जाते.

आंघोळीपूर्वी तेल लावण्याचे फायदे

  • आंघोळीपूर्वी शरीरावर तेल लावून तुम्ही तुमची त्वचा आणि पाणी यांच्यामध्ये अडथळा निर्माण करता. त्यासाठी ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी हे करणे आवश्यक आहे.

  • आंघोळीपूर्वी गरम तेल लावल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते व आंघोळ केल्यावर ते सर्व धुऊन जाते.

Benefit of Oil Before a Bath
Skin Care Tips : आंघोळीनंतर 'या' 4 गोष्टी चेहऱ्यावर लावा, दिवसभरात राहाल टवटवीत
  • आंघोळीपूर्वी तेल लावल्याने तुमच्या शरीरातील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते कारण पाणी तेलातील आर्द्रता शोषून घेण्यास मदत करते.

  • गरम तेलाच्या मसाजमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि रक्त प्रवाह वाढतो.

  • तेल मसाज न करता आंघोळ करण्यापूर्वी अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com