
Egg Harmful For Health : अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. डॉक्टरही बऱ्याचदा अंडी खाण्याची सल्ले देतात. शरीराच्या गरजा पूर्ण करणारे नऊ अमिनो ऍसिड अंड्यामध्ये असतात.
अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात त्यामध्ये व्हिटॅमिन ए,बी, कॅल्शियम आणि प्रोटीन खूप जास्ती प्रमाणात असते. हिवाळ्यात अनेक लोक दिवसाची सर्वात उकडलेली अंडी खाऊन करतात पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो असे म्हणतात.
जर तुम्ही प्रमाणपेक्षा जास्ती अंडी खात असाल तर डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे. पुढील अहवाल वाचून तुमच्या लक्षात येईल की गरजेचे पेक्षा जास्ती अंडी (Eggs) खाण्याचे नुकसान
1. अहवालानुसार काय म्हटले आहे?
मेडिकल न्यूज टुडे मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार अंडी पोषण तत्त्वांनी भरपूर असतात म्हणून ते लोकांमध्ये ब्लड क्लॉटिंगचा धोका निर्माण करू शकते. अमेरिकामधील (America) क्लिनिकच्या एका अभ्यासानुसार असे दिसून आले,की जेव्हा आपण जास्त प्रमाणात कोलिन न्यूट्रिशन घेतो तेव्हा रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अधिक वाढतो तसेच अंड्यामध्ये कोलिन न्यूट्रिशन जास्ती प्रमाणात असते त्यामुळे दररोज अतिरिक्त अंड्याचे सेवन केल्याने या समस्यांचा सामना करण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुम्हाला किती अंडी खाण्याची गरज आहे याचा सल्ला डॉक्टरांकडून (Doctor) घेणे नेहमी गरजेचे असते.
2. कोलिनचा शरीराला होणारा फायदा
मेडिकल न्यूज टुडे नुसार, आपल्या शरीरात काही प्रमाणात कोलिन तयार होत असते. परंतु बहुतेक कोलिन आपल्याला आहारातूनच मिळत असते. कोलिन शरीराची कार्य चालवण्यासाठी उपयुक्त असते. तसेच ते चयापचय प्रणाली आणि पेशींची वाढ सुधारण्यास मदत करते. संशोधनात असे समोर आले आहे की आतड्यातील बॅक्टेरियामध्ये कोलिन मिसळतात आणि नवीन पदार्थ TMAO तयार होऊ लागतो जे प्लेटलेट्स एकमेकांना अडकवतात आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यास सुरू होते. रक्त गोठल्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.