Facebook Loss: फेसबुकला मोठं नुकसान, Apple च्या 'या' फिचरमुळे मेटाचे 20% शेअर्स टक्क्यांनी घसरले...

Facebook Loss: मेटा कंपनीचा कमाईचा प्राथमिक स्त्रोत हा त्याचा जाहिरात व्यवसाय आहे, जो जगातील काही सर्वात मोठ्या सोशल प्लॅटफॉर्म जसे Facebook, Instagram आणि WhatsApp यांमधून असलेल्या वापरकर्त्यांच्या माहितीच्या प्रचंड डेटाबेसवर तयार केलेला आहे.
Facebook Loss 20% Shares
Facebook Loss 20% SharesSaam TV

जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय सोशल मीडिया साईट फेसबुकला (Facebook) मोठा फटका बसला आहे. न्यूयॉर्कच्या शेअर बाजारात (Sahre Market) फेसबुकचे शेअर्स सुमारे २० टक्क्यांपेक्षा जास्त अंकाने खाली आले आहे. न्यूयॉर्कमधील शेअर बाजारात ट्रेडिंगनंतर फेसबुकचे (Facebook) शेअर्सचे घसरले, याचा परिणाम म्हणून कंपनीचं स्टॉक मार्केटमधील मूल्य जवळपास 200 अब्ज डॉलरने घसरलं आहे. ॲपलच्या (Apple) प्रायव्हेसी फिचरमुळे आणि टिकटॉक, यूट्यूब यांमुळे फेसबुकला तगडं आव्हान मिळत आहे. (Big loss to Facebook, Apple's privecy feature caused Meta's shares to fall by 20% ...)

हे देखील पहा -

मेटा (Meta) ही फेसबुकची पॅरेंट कंपनी आहे. मेटाचे मुख्य वित्तीय अधिकारी डेव्ह वेहनर यांनी बुधवारी एका कॉन्फरन्स कॉलमध्ये सांगितले की येत्या तिमाहीत कंपनीचा महसूल अपेक्षेपेक्षा कमी असू शकतो. यामुळे कंपनीचा स्टॉक 20 टक्क्यांनी घसरला आणि त्याचे मार्केट कॅप $ 200 बिलियनने कमी झाले. विश्लेषकांच्या 30.15 अब्ज डॉलरच्या अपेक्षेच्या तुलनेत पहिल्या तिमाहीत त्याची कमाई $27-29 अब्ज डॉलर असू शकते असे मेटा कंपनीने सांगितले आहे.

ॲपलच्या प्रायव्हेसी फिचरमुळेही (Apple Privacy Features ) फेसबुकला मोठं नुकसान झालं आहे. ॲपलच्या गोपनीयता धोरणानुसार यूजर्सचा डेटा (Data) सुरक्षित ठेवण्यासाठी ॲपलने आपल्या सॉफ्टवेअर्समध्ये अनेक बदल केले आहेत, यामुळे फेसबुक आणि इतर जाहिरात कंपन्यांना यूजर्सची लोकेशन कळत नाही, ज्यामुळे ग्राहकांना जाहिराती दाखवण्यात फेसबुकला अनेक अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे टिकटॉकसारख्या (Tiktok) शॉर्ट व्हिडिओ ॲप आणि यूट्यूबमुळेही (Youtube) फेसबुकचे यूजर्स घटले आहे.

मेटा कंपनीचा कमाईचा प्राथमिक स्त्रोत हा त्याचा जाहिरात व्यवसाय आहे, जो जगातील काही सर्वात मोठ्या सोशल प्लॅटफॉर्म जसे Facebook, Instagram आणि WhatsApp यांमधून असलेल्या वापरकर्त्यांच्या माहितीच्या प्रचंड डेटाबेसवर तयार केलेला आहे. जेव्हा ॲपलने वापरकर्त्यांना ॲप्सना माहिती शेयर करण्यापासून रोखण्याचा पर्याय दिला तेव्हा, जाहिरातीसाठी यूजर्सचा डेटा संकलित करण्याचे प्राथमिक माध्यम बंद झाले. एप्रिल 2021 मध्ये लॉन्च झालेल्या Apple च्या iOS 14.5 अपडेटचा भाग म्हणून हा बदल आला आणि ॲप प्रकाशकांना जाहिरात विक्रीसाठी ग्राहकाचे व्रर्तन ट्रॅक करण्यासाठी परवानगी मागणारा पॉप-अप समाविष्ट करण्यास भाग पाडले. वापरकर्त्यांनी निवड रद्द केल्यास, विविध डेटा प्राप्त करण्यापासून ते ॲप बंद करते यामुळे फेसबुकला डेटा मिळत नसल्यानं फेसबुकला मोठं नुकसान होतंय.

Facebook Loss 20% Shares
जया बच्चन यांना कोरोनाची लागण, चित्रपटाचे शूटिंग थांबवले

टिकटॉककडूनही कठीण आव्हान:

या 18 वर्षांच्या कंपनीला टिकटॉक आणि यूट्यूबच्या कठीण आव्हानाचाही सामना करावा लागत आहे. मोठ्या संख्येने वापरकर्ते या प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. याचा आगामी तिमाहीत फेसबुकच्या उत्पन्नावर वाईट परिणाम होऊ शकतो. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत फेसबुकचे 2.91 अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते होते आणि मागील तिमाहीच्या तुलनेत या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे फेसबुक आता काय पाऊल उचलते हे पहावं लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com