Aadhaar Linking Voter ID : आधार कार्ड-मतदान ओळखपत्र लिंकसंदर्भात मोठी अपडेट, लगेच चेक करा !

Aadhaar Linking : आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्यासंदर्भात मोठी अपडेट आली आहे.
Aadhaar Linking Voter ID
Aadhaar Linking Voter IDSaam Tv

Aadhaar Linking With Voter ID Deadline : आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्यासंदर्भात मोठी अपडेट आली आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी लिंक करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवली आहे. याआधी मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत १ एप्रिल २०२३ पर्यंत होती. कायदा आणि न्याय मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आता ३१ मार्च २०२४ पर्यंत आधार कार्डला मतदान ओळखपत्राशी ऑनलाइन (Online) किंवा एमएमएसद्वारे जोडता येऊ शकते. केंद्र सरकारने मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात मोठा दिलासा दिला आहे.

Aadhaar Linking Voter ID
Adhar Card Update | १० वर्षाने आधारकार्ड अपडेट करणं आवश्यक; पाहा व्हिडीओ

सरकारने मतदान ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत एका वर्षासाठी वाढवून दिली आहे. ज्या नागरिकांनी (Citizens) आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र अद्याप जोडणी केलेली नाही, त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

सरकारने आधार कार्ड-मतदान ओळखपत्र जोडण्यासाठी अंतिम मुदत वाढवली असून, ती ३१ मार्च २०२४ केलेली आहे. पण आधार आणि मतदान ओळखपत्र जोडणे ऐच्छिक आहे.

...म्हणून सरकारनं उचललं हे पाऊल

दरम्यान, निवडणुकांवेळी बोगस मतदान होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये लोकसभेत एक विधेयक मांडले होते. ते सभागृहात मंजूर करण्यात आले होते. या विधेयकानुसार, देशात आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र जोडणे अधिकृत झाले होते.

Aadhaar Linking Voter ID
Adhar Card | आधार कार्ड लिंकबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, पाहा सविस्तर बातमी

एसएमएसद्वारेही लिंक करू शकता आधार!

आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरबसल्या मोबाइलवरूनही लिंक करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक एसएमएस पाठवावा लागेल. आधार कार्डवरील क्रमांक १६६ किंवा ५१९६९ वर एक मेसेज पाठवावा लागेल. मेसेजमध्ये ECLINK स्पेस ईपीआयसी क्रमांक स्पेस आधार क्रमांक लिहावा लागेल आणि वर दिलेल्या क्रमांकावर पाठवावा लागेल.

असा करा आधार-व्होटर आयडी लिंक -

१. राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (एनव्हीएसपी)च्या अधिकृत वेबसाइट nvsp.in वर जा.

२. पोर्टलवर लॉग इन करा आणि होमपेज वर सर्च इन इलेक्टोरल रोल पर्यायावर जा.

३. व्यक्तिगत आवश्यक विवरण आणि आधार क्रमांक नोंदवा

४. आधार क्रमांक आणि माहिती नोंदवल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा इमेलवर एक ओटीपी मिळेल.

५. व्हेरिफाय करण्यासाठी ओटीपी नोंदवा. त्यानंतर तुमचे मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com