
BSNL Recharge Plan : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL (Mobile Prepaid Plans) अनेक दिवसांपासून Jio, Airtel, Vodafone Idea सारख्या खाजगी कंपन्यांना आव्हान देत आहे. BSNL कडे अनेक असे प्लॅन आहेत जे इतर खाजगी कंपन्यापेक्षा सवस्त दरात मिळतात. या प्लॅनमध्ये युजर्सना डेटा, कॉलिंग, SMS सह अनेक बेनिफिट्स मिळतात.
BSNL एवढ्या सवस्तात रिचार्ज देण्याचे कारण म्हणजे 4G सर्व्हिस नसणे मात्र आता या कंपनीने त्यांचे रिचार्ज चे रेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्या नवीन प्लॅन नुसार BSNL युझर्सला जास्ती पैसे मोजावे लागतील.जाणून घेवूया BSNL च्या नवीन प्लॅन बद्दल अधिक माहिती.
BSNL ने त्यांच्या तीन रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. कंपनीने Rs 269, Rs 499 आणि Rs 799 च्या प्लॅनचे फायदे कमी केले आहेत.
Rs.269 मध्ये आता काय मिळणार?
या रिचार्ज मध्ये bsnl युझर्सला 28 दिवसांची validity मिळणार आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग,2 GB डेली डेटा, 100 SMS, BSNL tune आणि इतर सुविधा मिळणार आहेत अगोदर हा प्लॅन 30 दिवसांसाठी मिळत होता.
Rs.499 मध्ये कोणता प्लॅन?
हा प्लॅन युझर्स ला रोज 2 जिबी डेटा ,अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग,रोज 100 SMS, BSNL tune आणि गेमिंग या सुविधा मिळतात.हा प्लॅनची validity 75 दिवसांची आहे.अगोदर हा प्लॅन ९० दिवसांसाठी मिळत होता. डिसेंबरमध्ये हाच प्लॅन ८० दिवसांसाठी मिळत होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.