New Cars: नववर्षात नवी गाडी घ्यायचा विचार करताय? 2023 मध्ये लॉंन्च होणाऱ्या 'या' गाड्या एकदा पाहाच

चालू वर्षाप्रमाणेच येणाऱ्या नववर्षातही ऑटोमोबाईल क्षेत्रात नवीन कार तयार होणार आहेत. १३ जानेवारी २०२३ ते १८ जानेवारी दरम्यान देशामध्ये ऑटो एक्सपो पार पडणार आहे.
Car
Car Saam TV

News Cars Options : चालू वर्ष सरता सरता प्रत्येकालाच आता नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. नवीन वर्षात नवीन ध्येय, धोरणांसह नवीन खरेदी करण्याचीही प्रत्येकाला इच्छा असते. नवीन खरेदीसोबत नव्या वर्षाच दिमाखात स्वागत करण्याची अनेकांनी तयारी सुरू केली आहे. या खरेदीमध्ये प्रामुख्याने चार चाकी गाडी घेण्याचा अनेकांची इच्छा असते. (News Cars)

चालू वर्षाप्रमाणेच येणाऱ्या नववर्षातही ऑटोमोबाईल क्षेत्रात नवीन कार तयार होणार आहेत. १३ जानेवारी २०२३ ते १८ जानेवारी दरम्यान देशामध्ये ऑटो एक्सपो पार पडणार आहे. ज्यामधील अनेक नवीन कार पाहायला मिळणार आहेत. पाहूया अशाच कार्सबद्दलची माहिती ज्या या शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. (Latest Marathi News)

Car
Samsung new phone : Samsung चा नवा फोन अगदी 10 हजाराच्या आत; 13MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी, जाणून घ्या कुठे मिळेल

मारुती जिमनी (Maruti Gymny) : मारुती सुझुकीच्या या एसयूव्हीमध्ये लँड रोवर आणि डिफेंडरप्रमाणे ऑफ रोड फिचर्स हाय परफॉर्सन्ससह पाहायला मिळतील. सध्या या कारची चाचणी सुरू असून ही दिमाखदार कार लांब व्हिलबेस आणि अधिक स्पेससह मजबूतसह सुसज्ज आहे. ही कार पुढील वर्षी या शोमध्ये सादर केली जाऊ शकते.

मारुती बॅलेनो क्रॉस (Maruti Baleno Cross) : मारुती सुझुकीची बॅलेनो गाडी चांगलीच प्रसिद्ध आहे. त्याचीच प्रिमियम हॅचबॅक कार बलेनोची एसयूव्ही व्हर्जन असेल. कंपनीने या गाडीची चाचणीही केली असून ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाईल. या गाडीची किंमत 10 लाखांच्या आत असू शकते.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift) : सध्या तरुणाईमध्ये ह्यूंदाई कार्सची चांगलीच क्रेज आहे.त्यामध्ये ह्यूंदाई क्रेटा प्रचंड लोकप्रिय आहे. आता कंपनी या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन आणणार आहे. ही फेसलिफ्ट केलेली व्हर्जन काही परदेशी बाजारपेठांमध्ये आधीच विक्रीसाठी आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये ही गाडी सादर केली जाण्याची शक्यता आहे.

ह्युंदाई वेरना (Hyundai Verna) : भारतातील सर्वात विक्री होणाऱ्या गाड्यांमध्ये या मॉडेलची गणना केली जाते.गाडीचा आलिशान लूक नेहमीच गाडी शौकिनांना भुरळ घालताना दिसतो. कंपनीने या गाडीचे नवीन जनरल मॉडेल तयार केले असून त्याची चाचणी सुरू आहे. २०२३ मधील ऑटो एक्सपोमध्ये या गाडीची झलक पाहायला मिळू शकते.

Car
Best Deals : 15 हजाराच्या आत मिळताय 5G स्मार्टफोन, इथून खरेदी केल्यास सूटही मिळेल !

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross) : टोयोटाची इनोव्हा आलिशान कार म्हणून ओळखली जाते. याच कारचे हायक्रॉस मॉडेल येणार आहे. ज्याने बाजारात येण्यापूर्वीच चर्चा होऊ लागली आहे. २०२३ मध्ये ऑटो एक्सपोमध्ये याची झलक पाहायला मिळणार आहे.

टाटा कर्व (Tata Curvv) : टाटाच्या गाड्यांचा सध्या मार्केटमध्ये चांगलाच बोलबाला आहे. ज्यामध्ये टाटा कर्व हे नवीन मॉडेल समाविष्ठ होणार आहे. ही कार टाटा नेक्सॉनचे व्हर्जन असेल. ईलेक्ट्रिक आणि आयसीई अशा दोन्ही व्हर्जनमध्ये ही गाडी उपलब्ध असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com