Side Effects Of Wearing Sunglasses : काय सांगता ! गॉगल लावल्याने डोळ्यांना होतो त्रास ? जाणून घ्या, इन्स्टाग्रामच्या व्हायरल पोस्टच सत्य
Pros and Cons of Sunglasses : सूर्याची अतिनील किरणे आपली त्वचा आणि डोळ्यांसाठी हानिकारक असतात. म्हणूनच उन्हाळ्यात बाहेर जाण्यापूर्वी आपल्याला सनस्क्रिन वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच आपल्या डोळ्यांनाही सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी सनग्लासेसचा वापर करतो.
पण सनग्लासेस खरंच आपल्या डोळ्यांचे सूर्यापासून संरक्षण करतात का? नुकत्याच इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमुळे हा प्रश्न सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतोय. हेल्थ-ऑप्टिमाइझिंग बायोहॅकर, मानसशास्त्र तज्ज्ञ, उद्योजक आणि जागतिक स्पीकर टिम ग्रे यांनी आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये सनग्लासेस आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. काय आहे या पोस्ट मागचे सत्य जाणून घेऊयात.

"उन्हाळ्याच्या (Summer) दिवसांत सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाचे विशिष्ट तरंग डोळ्यात फिल्टर होतात. जे पिट्यूटरी आणि पाईनल ग्रंथीच्या माध्यमातून मेंदूला बाहेरील सुर्यप्रकाशाच्या तीव्रतेबाबत संदेश पोहोचवतात. ज्यामुळे मेंदू आपल्या त्वचेला त्या तीव्रतेच्या सुर्यप्रकाशासाठी तयार करतो आणि 'क' व इतर जीवनसत्त्वे (Website) तयार करतो. आपण जेव्हा जेव्हा सनग्लासेचा वापर करतो तेव्हा मेंदूला बाहेरील वातावरणाचा अंदाज येत नाही.
सनग्लासेसमुळे मेंदूला बाहेरील वातावरण हे ढगाळ जाणवते, त्यामुळे मेंदू आपल्या त्वचेला सूर्याच्या हानीकारक किरणांपासून बचाव करण्यास असमर्थ ठरतो व त्वचा काळवंडू शकते. सनग्लासेसमुळे तुमचे सर्काडियन लय बिघडून तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला थकवा, निद्रानाश आणि नैराश्यासारख्या (Depression) समस्यांना सामोरे जावे लागू शकते."
सुर्यप्रकाश आपल्या शरीर आणि मूडवर प्रभाव पाडणाऱ्या हार्मोन्सच्या सायकलला सुरळीत ठेवण्यास मदत करतो. त्याचबरोबर सनग्लासेस आपल्या डोळ्यांना नैसर्गिक प्रकाशापासून दूर ठेवतात. ज्यामुळे डोळ्यांवर (Eye) ताण येतो व डोळे खराब होण्याची शक्यता असते." असे टिम ग्रे यांनी अपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे.
"तुम्ही सनग्लासेसना सायकिंग करताना ड्रायव्हींग करताना अधून मधून घालू शकता परंतु सनग्लासेसचा सततचा वापर डोळ्यांसाठी हानीकारक ठरु शकतो." असे देखील ते म्हणाले.
टिम ग्रे यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कोलंबिया विद्यापिठाने देखील या विषयी काही तथ्ये मांडली आहेत. त्यानुसार सनग्लासेस जर चुकीच्या पध्दतीने वापरले गेल्यास ते तुमच्या डोळ्यासाठी घातक ठरु शकतात.
बाजारात अनेक प्रकारचे सनग्लासेस उपलब्ध आहेत, पण प्रत्येक गॉगल अतिनील किरणांपासून बचाव करत नाहीत. आपल्या डोळ्यांना सुर्यप्रकाशाशी जुळवून घेण्याची सवय असते त्यामुळे जेव्हा तुम्ही सनग्लासेस घालता तेव्हा प्रकाश कमी होतो ज्यामुळे बुबूळ पसरते व अतिनील किरणे थेट डोळ्यांत जाण्याची शक्यता असते.
तेव्हा तुम्ही घातलेला गॉगल जर UV किरणांपासून बचाव करणारा नसेल तर डोळ्यांना नुकासन पोहोचू शकते. सनग्लासेस तेव्हाच सुरक्षित असतात जेव्हा त्याच्या फ्रेमचे टोक तुमच्या नाकाला टेकत असेल अशा पध्दतीने सनग्लासेस वापरणे तुमच्या डोळ्यांसाठी हानीकारक ठरणार नाही. त्याचबरोबर तुम्ही वापरत असलेले सनग्लासेस UV किरणांपासून बचाव करणारे असावेत. त्यामुळे अशा प्रकारे सनग्लासेस वापरल्याने डोळ्यांचे आणि डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेचेही संरक्षण होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.