Republic Day 2023 : तिरंगा बनवून साजरा करा प्रजासत्ताक दिन! पहा रेसिपी

प्रजासत्ताक दिन हा दिवस संपूर्ण देशामध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो.
Republic Day 2023
Republic Day 2023 Saam Tv

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त काहीतरी गोड किंवा स्पेशल असे बनवून हा दिवस साजरा करतात. हा दिवस संपूर्ण देशामध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो. लोक वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करायचे ठरवतात.

तुम्ही या वेळेस स्वयंपाक घरात तिरंग्याची काहीतरी नवीन झटपट अशी तयार होणारी रेसिपी बनवून हा साजरा करू शकता. अशीच एक रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे तिरंगा (Tiranga) पराठा ही रेसिपी तुम्ही घरी (Home) नक्कीच ट्राय करून बघा त्याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिले आहे.

Republic Day 2023
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यात काय फरक आहे? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

साहित्य -

पराठ्याचा केशरी भागासाठी - अर्धी वाटी गव्हाचे पीठ,एक चतुर्थांश गाजर प्युरी आणि तुमच्या चवीनुसार मीठ

पराठ्याच्या पांढऱ्या भागासाठी- अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि मीठ चवीनुसार.

हिरव्या भागासाठी- अर्धी वाटी गव्हाचे पीठ,पाउन वाटी मटार प्युरी आणि चवीनुसार मीठ.

Republic Day 2023
Happy 74th Republic Day 2023 Wishes : आपल्या प्रियजनांना द्या प्रजासत्ताक दिनाच्या 'या' खास शुभेच्छा

रेसिपी बनवण्याची पद्धत -

पराठा बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गाजर आणि मटारची प्युरी तयार करण्यासाठी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या मिक्सर मधून काढून घ्या त्यानंतर एका बाऊलमध्ये गाजरची प्युरी आणि मीठ टाकून कणिक मळून घ्या.

आता दुसरा बाउल मध्ये मटार ची प्युरी आणि मीठ टाकून कणिक मळून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये मीठ टाकून कणिक मळून एका साईडला ठेवून द्या. आता तुमच्याकडे तीन वेगवेगळ्या रंगाचे कणिक मळून तयार आहे.

आता छोटे छोटे तिन्ही कणिक चे गोळे एकमेकांना सारखे दाबा तिरंग्यासारखे करण्यासाठी कापून घ्या.गोळे पराठ्याच्या आकारात लाटून गरम तेल लावून पराठा दोन्ही बाजूने छान शेकून घ्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com