
ऑफिस हे आपलं दुसरं घरच. बरेचदा ऑफिसमध्ये काम करताना तिथलं वातावरणं हे खेळीमेळीचं असतं. ऑफिसमध्ये काम करण्याची पद्धत देखील थोडी वेगळी असते. या ठिकाणी आपले अनेक सहकारी देखील असतात. पण बरेचदा आपल्या चुकीच्या वागण्यामुळे त्याच्या परिणाम आपल्या कामावर होतो.
चाणक्य म्हणतात की, ऑफिसमध्ये आपण सगळ्यात आधी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायाला हवे. पण असे काही लोक असतात की, ते ऑफिसमध्ये कामाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींवर जास्त लक्ष देतात. ज्यामुळे करिअरमध्ये नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे ऑफिसमध्ये कोणत्या चुका करणे टाळायला हवे हे जाणून घेऊया.
1. वेळेवर काम पूर्ण न करणे :
काही लोक कामात खूप चांगले असतात, परंतु त्यांना वेळेवर काम पूर्ण करायची सवय नसते किंवा ते इतर गोष्टींमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवतात.वेळेवर (Time) काम न केल्यामुळे तुमच्या बॉससमोर तुमची इमेज खराब होते.
2. चित्रपट (Movies) आणि मालिका पाहणे :
ऑफिसमधले (Office) बरेच लोक नियोजित वेळेच्या आधी काम संपवतात. काम संपल्यानंतर असे लोक लॅपटॉपवर चित्रपट किंवा वेब सिरीज बघायला बसतात. परंतु या गोष्टी कधीतरी ठीक आहेत. या गोष्टी वारंवार घडत असतील तर लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत, ज्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळा येतो.
3. बॉसच्या सतत मागे मागे करणे
ऑफिसमध्ये असे काही लोक असतात ज्यांना असे वाटते की जर त्यांनी नोकरीमध्ये बॉसची हेरगिरी केली तर त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे ते सतत बॉसच्या मागे पुढे करत राहातात. त्यामुळे सहकाऱ्यांच्या मनात तुमच्या विषयी तेढ निर्माण होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.