
Relationship Tips : प्रेम म्हटलं की त्यात भांडण ही आलीच. प्रेमात सगळ काही माफ असतं परंतु, कधी कधी आपल्याला जोडीदाराच्या काही गोष्टीचा रागही येऊ शकतो. नात्यात काही गोष्टीची काळजी घेतली तर आपलं नातं अधिक फुलण्यास मदत होईल.
आचार्य चाणक्य म्हणतात की, नात्यात (Relation) आपण जर कोणते वचन दिले तर ते पाळायला हवे. कोणत्याही नात्याची सुख-शांती हे नाते टिकवणाऱ्यांच्या गोड नात्यावर अवलंबून असते. प्रियकर आणि प्रेयसीचे नाते कमकुवत असेल तर नात्यात दुरावा यायला वेळ लागत नाही. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांची काळजी (care) घेतल्यास प्रेमसंबंधांमध्ये येणारा तणाव लवकर दूर होईल.
1. आदर
आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने आपल्या जोडीदाराचा (Partner) आदर केला पाहिजे. जर एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराचा सर्वांसमोर अपमान करत असेल तर तो केवळ त्याच्या आत्म्यालाच धक्का देत नाही तर त्याचा आदरही गमावतो. असं झालं तर प्रेमसंबंधात दुरावा निर्माण होतो त्यामुळे प्रियकर-प्रेयसीने जोडीदाराचा आदर केला पाहिजे.
2. अहंकार
जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्यामध्ये अहंकार आणू नका. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर प्रेम संबंधांमध्ये अहंकार आला तर तुम्ही तुमच्या नात्याचे अस्तित्व कमी होते. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो. त्यामुळे याउलट जोडीदाराला महत्त्व द्या आणि प्रत्येक कामात मी नाही तर आपण असे म्हणा.
3. विश्वास
प्रेमात असणाऱ्या जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये अतूट विश्वास असणे खूप महत्वाचे आहे. ज्या नातेसंबंधात विश्वास आणि आत्मविश्वास असतो ते कोणत्याही कठीण आव्हानाला सहज सामोरे जाऊ शकतात. तर, ज्या नातेसंबंधात विश्वास नाही ते क्षणार्धात तुटू शकते.
4. स्वातंत्र्य
नातेसंबंधांमध्ये स्वातंत्र्य असणे खूप महत्वाचे आहे. बंधने असणार्यांपेक्षा स्वातंत्र्य असलेली नाती मजबूत असतात. ज्या नात्यात स्वातंत्र्य नसते, ते काही काळानंतर कंटाळवाणे होऊ लागतात म्हणूनच नात्यांमध्ये स्पेस देणं खूप गरजेचं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.