Chanakya Niti On Money: लालच बुरी बला है...! या 4 प्रकारच्या माणसांपासून नेहमी राहा दूर, अन्यथा आयुष्य होईल उद्धवस्त

Chanakya Niti On Money Saving: पैसा कमावण्यासाठी माणसाला अधिक कष्ट करावे लागते परंतु, जर पैसे योग्य मार्गाने कमावले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होतील.
Chanakya Niti On Money
Chanakya Niti On MoneySaam Tv

Chanakya Niti On Life Success: पैसा सगळ्यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. पैशाशिवाय जीवनाला अर्थ नाही. पैसा कमावण्यासाठी माणसाला अधिक कष्ट करावे लागते परंतु, जर पैसे योग्य मार्गाने कमावले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होतील.

आचार्य चाणक्यांनी (Chanakya) आपल्या नीतिशास्त्रात सांगितले आहे की मानवाने आपले जीवन कसे चालवावे. असे मानले जाते की चाणक्याची धोरणे पूर्वी होती तितकीच आजही प्रभावी आहेत. चाणक्य नीतीवरून जाणून घेऊया कोणत्या लोकांकडे या गोष्टी नाहीत.

Chanakya Niti On Money
Chanakya Niti On Success : ऑफिसमध्ये अशी माणसं असतात सगळ्यांना प्रिय, क्षणार्धात सोडवतात समस्या

आचार्य चाणक्य सांगतात, माणूस पैशांच्या (Money) बाबतीत अधिक लालचीपणा करतो त्यामुळे धन कमावताना तो या मार्गाचे अधिक सोपे मार्ग (Way) शोधतो. तसेच तो यासाठी अनेक चुकीचे मार्ग देखील स्वीकारतो ज्यामुळे आयुष्यात त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चाणक्य म्हणतात की, माणसांच्या अधिक लालची स्वभावामुळे त्याला या ४ गोष्टींना मुकावे लागते.

जे घराशी जोडलेले आहेत आणि जे मांस खातात त्यांच्याबद्दल आपल्याला ज्ञान किंवा दया नाही.

ज्यांना संपत्तीचा लोभ आहे त्यांच्यासाठी सत्य नाही आणि स्त्रीसाठी पवित्रता नाही

Chanakya Niti On Money
Kelvan Ceremony : 'हा' केळवणाचा ट्रेंड आला कुठून ?

1. चाणक्य म्हणतात की, जो विद्यार्थी अभ्यास सोडून घरातील इतर गोष्टींवर लक्ष देतो. तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी नेहमी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. अन्यथा घरातील कटकटीमुळे ते वाईट मार्गाला लागू शकतात.

2. आपल्या आयुष्यात अशी माणसे देखील असतात जी धनासाठी वाईट मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे अशा माणसांपासून वेळीच सावध राहा, अन्यथा आपणही त्यांचा मार्गाला लागून कूकर्म करू शकतो.

Chanakya Niti On Money
Cholesterol Causing Food : हे 3 पांढरे पदार्थ शरीरासाठी 'विष'च; झपाटयाने वाढते कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅकचाही धोका !

3. धनाचा लोभ असणाऱ्या व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नका. अशी माणसे अधिक घातक असतात. या प्रकराची माणसं धनाच्या मोहात बुडालेली असतात. ज्यामुळे आपणही वाईट मार्गांचा अवलंब करू शकतो.

4. चाणक्य सांगतात की, ज्यांचे आचारण अपवित्र असते ते शरीराने नाहीतर मनाने देखील अपवित्र असतात. अशी माणसं सतत पैशांच्या मागे धावत सुटतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com