
Child Oral Health : सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपण नियमितपणे ब्रश करतो. लहान मुले असोत की प्रौढ, प्रत्येकजण दातांच्या चांगल्या स्वच्छतेसाठी बाजारात मिळणारे अनेक महागडे टूथपेस्ट वापर असतो. बरेच लोक ब्रश करताना दात स्वच्छ करण्यासाठी अधिक प्रमाणात टूथपेस्टचा वापर करतात. दातांव्यतिरिक्त टूथपेस्टच्या अतिवापरामुळे तोंडाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
तज्ज्ञांच्या मते, टूथपेस्टचा वापर फक्त तोंडात फेस येण्यासाठी करावा, चवीसाठी नाही. टूथपेस्ट लहान मुले आणि प्रौढ दोघांसाठी सारखीच वापरली जाते, परंतु मुलांचे दात नाजूक आणि कमकुवत असतात, त्यामुळे ते लवकर खराब होतात. दातांना स्वच्छ (Clean) करण्यासाठी किती टूथपेस्ट आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
किती टूथपेस्ट आवश्यक आहे?
दातांच्या चांगल्या आणि खोल स्वच्छतेसाठी चांगली टूथपेस्ट वापरणे फायदेशीर ठरू शकते. Health.com च्या मते, टीव्हीवर किंवा जाहिरातींमध्ये दिसणारे टूथपेस्टचे प्रमाण लोकांना जाहिरातींची माहिती देण्यासाठी असते.
सर्वसाधारणपणे, एवढी टूथपेस्ट वापरल्याने तोंडाच्या समस्या वाढू शकतात. एखाद्या व्यक्तीने एका वेळी फक्त मटारच्या दाण्याइतकी टूथपेस्ट वापरली पाहिजे आणि ही सूचना टूथपेस्टच्या पॅकेजिंगवर देखील लिहिलेली असते. ज्याकडे कुणीही लक्ष देत नाही.
मुलांसाठी हानिकारक असू शकते
जास्त प्रमाणात टूथपेस्ट वापरल्याने मुलांचे सर्वाधिक नुकसान होते. जास्त प्रमाणात वापरल्याने मुलांच्या दुधाचे दात खराब होऊ शकतात. याचे कारण असे की, जेव्हा फ्लोराईड जास्त प्रमाणात घेतले जाते तेव्हा ते विकसनशील दातांवर फ्लोरोसिस नावाची कॉस्मेटिक स्थिती निर्माण करू शकते. कॉस्मेटिक समस्यांमुळे दातांवर पिवळे आणि तपकिरी डाग पडू शकतात, तसेच काही वेळा दातांमध्ये खड्डे देखील होऊ शकतात. म्हणूनच प्रत्येकाने, मग तो मोठा असो किंवा लहान, प्रत्येकाने वाटाण्याच्या दाण्याएवढी टूथपेस्ट वापरली पाहिजे.
कमी टूथपेस्ट वापरल्यानेही समस्या उद्भवू शकतात
खूप कमी टूथपेस्ट वापरल्याने देखील समस्या उद्भवू शकतात. अपुरी टूथपेस्ट फोम किंवा बुडबुडे तयार करू शकत नाही, ज्यामुळे दात व्यवस्थित साफ होणार नाहीत. याशिवाय दातांच्या संरक्षणासाठी फ्लोराईड पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाही. दात साफ करताना तोंडात पाणी घालू नका कारण फ्लोराईड दातांवर कार्य करण्यास वेळ घेते. जर तोंडात पाणी (Water) असेल किंवा ब्रश खूप ओला असेल तर ते काम करू शकणार नाही.
माउथवॉश वापरा
तोंडाच्या स्वच्छतेसाठी ब्रश करण्याव्यतिरिक्त माउथवॉशचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे फ्लोराईडचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यासोबतच दात आणि तोंड दोन्ही जंतूमुक्त राहतील. दात स्वच्छ करण्यासाठी योग्य प्रमाणात टूथपेस्ट वापरणे आवश्यक आहे. आपण दंत आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.