tiffin box idea
tiffin box ideaब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये; हे आरोग्यदायी पदार्थ द्या!

जेवणाच्या डब्यात रोज नवीन आरोग्यदायी पदार्थ असे द्या.

मुंबई : जर तुमचे मुलंही शाळेत जात असेल आणि रोज सकाळी जेवणाच्या डब्यात काय द्यायचे याचा विचार करून तुम्हालाही टेंशन येत असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही जेवणाच्या डब्यात रोज नवीन आरोग्यदायी गोष्टी बनवू शकता. खरेतर, मुलांची तक्रार असते की, दररोज तेच तेच जेवण खाऊन त्यांना कंटाळा येतो. त्यांना इतरांचा टिफिन बॉक्स खायला आवडते. अशा वेळी पालकांसमोर पेच पडतो की, रोज आरोग्यदायी आणि चविष्टही काय बनवायचे.

हे देखील पहा -

मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी त्यांनी शक्यतो घरचे बनवलेले अन्न (Food) खाणे आवश्यक आहे, ज्यामध्ये पुरेसे पोषक घटक असतात. त्यामुळे त्यांच्या टिफिन बॉक्समध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे इत्यादी असणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही दररोज जेवणाच्या डब्यात मुलांना काय देऊ शकता.

मुलांना या गोष्टी टिफिन बॉक्समध्ये द्या

१. तुम्ही मुलांना ओट्स, संत्री आणि मनुका यापासून तयार केलेले मफिन्स देऊ शकता. तसेच तुम्ही टोमॅटो, काकडी आणि चीज घालून तयार केलेले सॅलड पॅक करू शकता.

२. मिक्स भाजी आणि बेसनाचा चीला देऊ शकता. यासोबत तुम्ही फ्रूट (Fruit) सॅलड किंवा मिल्क शेकही देऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठी हे सर्वोत्तम पदार्थ असतील.

tiffin box idea
मायग्रेनच्या दुखण्याने त्रस्त आहात, तर असा मिळवा आराम

३. कडधान्यासोबत पास्ता किंवा मॅकरोनीसुध्दा देऊ शकता. यासोबत तुम्ही सफरचंद किंवा संत्र्याच्या फोडी द्या. पास्ता हेल्दी तसेच चविष्ट असल्यामुळे तो मुलांना खूप आवडतो.

४. कॉर्न आणि पनीरचा ब्रेड रोल बनवा. यासोबत तुम्ही द्राक्षेही द्या. कॉर्न आणि पनीरसोबत तुम्ही बटाटा किंवा मुलांची आवडती भाजीही सारणात वापरू शकता.

५. भाज्यांचे कटलेट बनवून तुम्ही टिफीनमधे देऊ शकता. तुम्ही त्याचे स्टफिंग एक दिवस आधी तयार करू शकता. सकाळी हलके तळून घ्या आणि टिफिनमध्ये पॅक करा.

अशाप्रकारे तुम्ही मुलांना आरोग्यदायी टिफिन बॉक्स देऊ शकता.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com