
Cholesterol : भारतात कॉलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कॉसेस्ट्रॉल हाय ब्लडप्रेशर, लठ्ठपणा, किडणीचे रोग, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांना निमंत्रण देतो. तर, पहिल्यापासूनच या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी थोडासाही हलगर्जीपणा त्यांची कॉलेस्ट्रॉल लेव्हल, मधुमेह आणि ब्लड प्रेशर कमी-जास्त करु शकतो जे त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.
आजकाल धक्काधकीची जिवनशैली (Lifestyle) आणि चुकीचा आहार यामुळे अनेक लोकांना कॉलेस्ट्रॉलच्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. कॉलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरात उपस्थित मेणासारखा पदार्थ आहे. साधारणतः आपल्या शरीरात चांगले आणि वाईट अशा दोन प्रकारचे कॉलेस्ट्रॉल आळतात. चांगले कॉलेस्ट्रॉल रक्तात साठणारी फॅट कमी करण्यास मदत करते ज्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या स्वच्छ राहातात, जेणे करुन हृदयापर्यंत रक्तप्रवाह योग्यप्रकारे होऊ शकते.
तर वाईट कॉलेस्ट्रॉलची (Cholesterol) लेव्हल वाढल्यास रक्तातील फॅट रक्तवाहिनीत साठू लागते, ज्यामुळे हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताचा प्रवाह अतिशय संथ गतीने होतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांचा धोका वाढतो. कॉलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे प्रयत्न करतात परंतु कॉलेस्ट्रॉल काही कमी होत नाही. या मागे अनेक कारणं आहेत. चला पाहुयात काय आहेत ती कारणंः
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
कोलेस्टेरॉलच्या बाबतीत अशी काही लक्षणे (Symptoms) आहेत जी तुम्ही अजिबात दुर्लक्षित केली नाही पाहिजेत. जसे की मळमळणे, शरीर सुन्न पडणे, खूप थकवा जाणवणे, अचानक छातीत दुखायला लागणे, श्वास घेण्यास समस्या निर्माण होणे, हात पाय थंड पडणे, उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होणे. यांसारखी लक्षणे ही सहसा कोलेस्टेरॉल वाढल्याचेच संकेत देतात. त्यामुळे गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर योग्य उपचार सुरु करा.
कोलेस्टेरॉल वाढल्याने काय होते?
CDC यांच्या रिपोर्टनुसार, हाय कोलेस्टेरॉलची लक्षणे सामन्यत: तोवर दिसून येत नाहीत जोवर हे कोणत्या गंभीर समस्येचे कारण बनत नाही. हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही एलडीएल कोलेस्टेरॉल लेव्हल जाणून घेण्यासाठी ब्लड टेस्ट केली पाहिजे. कोलेस्टेरॉल कडे लक्ष न दिल्यास काही कळावे त्याचा थर हळूहळू नसांमध्ये जमा होऊ लागतो. यामुळे हृदयाका नुकसान पोहोचते आणि हार्ट अटॅक वा स्ट्रोक येऊ शकतो.
टेस्ट न करता कोलेस्ट्रॉल वाढलं हे कसं समजावं?
समस्या अशी आहे की कोलेस्टेरॉलमुळे शरीरात काही गंभीर समस्या निर्माण होत नाही तोपर्यंत समजत नाही की ते वाढलंय. वयाच्या 11 व्या वर्षापासून ते वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत दर पाच वर्षांनी तुमची फोर्स लिपिड टेस्ट केली पाहिजे यावर डॉक्टरही सहमत आहेत.
45 वर्षांनंतर गरजेची आहे टेस्ट
नॅशनल हार्ट लंग एंड ब्लड इंस्टीट्यूट (एनएचएलबीआई) यांनी असा सल्ला दिला आहे की, पुरुषांना ज्यांचे वय 45 ते 65 वर्षे आहे त्यांनी आणि स्त्रिया ज्यांचे वय 55 ते 64 वर्षे आहे त्यांनी दर एक ते दोन वर्षांनी ब्लड टेस्ट केली पाहिजे. जर तुमचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक आहे तर मात्र तुम्ही दर वर्षी कोलेस्टेरॉलची टेस्ट केलीच पाहिजे असे जाणकार सांगतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमच्या आसपास सुद्धा कोणाला या बाबत माहिती हवी असले तर त्यांच्यात जागरूकता पसरा. तेव्हाच या आतल्या आजाराशी आपण लढू शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.