Fashion: इअरिंग्जची निवड चेह-याच्या ठेवणीनुसार करा.

earrings: कानातले तेव्हाच छान दिसतात जेव्हा आपली निवड अचूक असते
Fashion Tips in Marathi, How to choose perfect Jewellery
Fashion Tips in Marathi, How to choose perfect Jewelleryब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या बाजारात (market) नवनवीन पध्दतीच्या इअरिंग्ज आपल्याला पाहायला मिळतात परंतु आपल्या चेह-याला कोणत्या इअरिंग्ज (earrings) साजेशीर दिसतात हे आपल्याला कळत नाही. अगदी दहा रुपयांपासून सुरू होणारी कानातली हजारो रुपयांपर्यतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत, पण कानातले तेव्हाच छान दिसतात जेव्हा आपली निवड अचूक असते. त्यासाठी काही कानमंत्र. (Choose earrings according to your face.)

हे देखील पाहा -

१. जर तुमचा चेहरा गोलाकार असेल, तर तुम्हाला लाँग ड्रॉप इअरिंग्ज घालायला हवेत. असं करण्याने तुमचा चेहरा मोठा वाटणार नाही. तुम्ही रंगीत जेमस्टोनचे लांब कानातले निवडू शकता. (Fashion Tips in Marathi)

२. तुमचा चेहरा (face) लंबाकार असल्यास मोठे टॉप्स तुम्हाला छान दिसतील. यामध्ये कंटेपरेरी सफायर, रूबी किंवा एमरल्ड हूप्सची निवड करू शकता.

३. बदामी आकाराचा चेहरा असेल, तर पिरॅमिड स्टाइलचे शैण्डेलियर छान दिसतील. जे हनुवटीच्या जवळचा भाग कव्हर करुन तुमच्या चेह-याला गोलाकार आकार देतील.

४. चेहरा चौकोनी असल्यास डॅपर स्टड इयरिंग्स, लाँग ड्रॉप इयरिंग्स किंवा इग्जैगरेटेड इयरिंग्स घालू शकता. गोलाकार डायमंड स्टड्स किंवा प्रिंसेस कट सफायर, रूबी किंवा एमरल्ड इयरिंग्स खूप चांगले पर्याय आहेत.

Fashion Tips in Marathi, How to choose perfect Jewellery
Hair Care Dos : तुमच्या केसांचे आयुष्य असे वाढवा..!

५. शंकरपाळीसारखा चेहरा असल्यास तरुणींनी छोट्या किंवा मध्यम आकाराची इयरिंग्स घालावी.

६. अंडाकार चेहरा खूप आकर्षक मानला जातो. असा चेहरा असणा-या व्यक्तींना कोणत्या प्रकारचे इयरिंग्स छान दिसतात.

७. गवाळ रंग असणा-या तरुणींनी ब्राइट किंवा रंगीत कानातली घालावी. गो-या तरुणींनी लाल रंगाची, तर काळ्या तरुणांनी ब्लॅक किंवा मरुन रंगाची कानातली शोभून दिसतात.

अशाप्रकारे केसांच्या ठेवणीवर देखील लक्ष ठेवणे आवश्यक आहे. केस छोटे असतील तर लांब डेंगल्स आणि शैण्डेलियर इयरिंग्स सहज घालू शकता, पण तुम्ही ड्रेमेटिक इयरिंग्स घालू शकत नाही. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही इतर दागिने घालणार असाल, तर नजरेत भरतील अशी कानातली किंवा बोल्ड इयरिंग्स घालणं टाळा.

सध्या फोकस ज्वेलरीला पसंती मिळत आहे, म्हणजे कोणता तरी एक दागिना बोल्ड असणे, ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्यावर जाईल. म्हणजे इयरिंग्स बोल्ड असतील, तर गळ्यात काही घालू नका किंवा एखादी नाजूक चेन घाला.

तुमचे केस (hair) खूप लांब असल्यास तुमच्याकडे ज्वेलरी निवडण्याचे खूप कमी पर्याय आहेत. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या इयरिंग्जची निवड करु शकता.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com