
Tobacco Mark : सध्या अनेक तरुण मंडळी व्यसनाधीन होताना दिसत आहेत. अंमली पदार्थांचे व्यसन करणे ही तर श्रीमंतांची कामं, पण मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील मुलं सर्रास तंबाखू आणि गुटखा खाताना दिसतात. अशी व्यसने केल्याने तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. ज्या पाकिटातून गुटखा किंवा तंबाखू मिळते त्यावर देखील हे लिहिलेलं असतं. मात्र तरी देखील अनेक जण याचं व्यसन करतात. (Health Tips)
गुटखा तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींच्या तोंडाचा वास येतो. त्यांचे दात काळे, लाल, पिवळे असे दिसू लागतात. सतत गुटखा चावल्याने दातात फटी पडतात. तसेच तोंडात तासंतास तंबाखू ठेवल्याने कर्करोग होतो. आपण जे व्यसन करत आहोत त्याने आपलं मोठं नुकसान होतंय हे समजल्यावर काही जण गुटखा, तंबाखू अशी व्यसने सोडतात. मात्र व्यसन सुटलं तरी त्यामुळे दातांवर असलेले डाग काही लगेच जात नाहीत.
दातांवर डाग असल्याने चार माणसात हसता येत नाही. दात दिसले की आपण व्यसन करत आहोत हे समोरच्या व्यक्तीला लगेच समजते. त्यामुळे या बातमीमधून दातांवर असलेले हे डाग घालवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हे जाणून घेऊ. हे उपाय घरगुती आहेत. याने तुम्हाला इतर कोणताही त्रास होणार नाही.
दातांवरचे डाग घालवण्यासाठी आधी दात स्वच्छ घासा. दात घासण्याच्या ब्रशवर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घ्या. त्यानंतर तुमचे दात किमान 10 मिनटे तरी स्वच्छ घासा. अशा पद्धतीने दिवसातून किमान 3 वेळा तरी दात घासावे. याने तुमचे दात पांढरे होतील.
आहारात फळे घ्यावी. यामध्ये जास्त करून गाजर खावे. गाजरामध्ये फायबर असते. त्याने दात मजबूत होतात. तसेच दातात फटी असतील आणि जेवणानंतर अन्नाचे कण दातात अडकत असतील तर गुळणा करा. यावेळी पाण्यात लिंबाचा रस मिसळून गुळणा करण्याची सवय लावा. त्यामुळे तोंडाचा वास देखील येणार नाही.
तुमचे दात जास्त पिवळे पडले असतील तर स्ट्रॉबेरी देखील यावर काम करते. स्ट्रॉबेरी बारीक करून घ्या. ती पेस्ट दातांवर हलक्या हाताने घासा. त्यामुळे दातांवरील पिवळेपणा कमी होईल. तसेच दात कायम असेच स्वच्छ आणि पांढरेशभ्र ठेवण्यासाठी तंबाखू आणि गुटखा ही व्यसने कायमची बंद करा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.