कार्पेटला अशाप्रकारे साफ करा दिसेल नव्यासारखे

आपण घर कितीही स्वच्छ केले तरी काही वेळानंतर पुन्हा धूळ दिसू लागते.
Cleaning tips in Marathi, how to clean carpet?
Cleaning tips in Marathi, how to clean carpet?ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपण घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याची साफसफाई करतो परंतु, आपल्या कार्पेटवर धुळ अडकते आणि त्याकडे आपण दुर्लक्ष तर करत नाही ना. (Cleaning tips in Marathi)

हे देखील पहा -

आपण घर कितीही स्वच्छ (Clean) केले तरी काही वेळानंतर पुन्हा धूळ दिसू लागते. काहींना धुळीचा त्रास असल्यामुळे वारंवार साफसफाई केल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. परंतु, धूळ साफ न केल्यास घरात ठेवलेले फर्निचर आणि वस्तूही खराब होऊ शकतात. घरामध्ये धूळ येऊ नये यासाठी अनेक उपाययोजना केल्या आणि कार्पेटची सोप्या उपायांनी स्वच्छता केली तर घरात धूळ पसरणार नाही तसेच घराची स्वच्छताही चांगली होईल. आपले लिव्हिंग किंवा बेडरुम हा कार्पेटचा आवश्यक भाग आहे. पावसाळ्यात त्यावर अधिक घाण साचते. कार्पेट रोज स्वच्छ केले नाही तर साचलेली घाण आपली खोली खराब होते. आपल्या घरातील कार्पेट स्वच्छ कसे करायचे हे पाहूया.

१. ड्राय कार्पेट क्लीनिंग करण्यासाठी आपण मशीनीचा वापर करु शकतो. याच्या सहाय्याने आपण कार्पेटवरील घाण सहज काढू शकतो. त्यामुळे त्यातील ओलसलपणा कमी होईल.

Cleaning tips in Marathi, how to clean carpet?
पावसाळ्यात धुतलेल्या कपड्यांना वास येत असेल तर हे करुन पहा

२. आपण शॅम्पूचा वापर करुन कार्पेट साफ करु शकतो. शॅम्पूमुळे कार्पेट स्वच्छ व चमकदार होईल. शॅम्पू पाण्यात टाकून ब्रशच्या मदतीने आपण कार्पेट साफ करु शकतो.

३. कार्पेट साफ करण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करु शकतो यामुळे कार्पेटवरील जंत मरतील व कार्पेट साफही होईल. घरातील आजाराचे प्रमाणही कमी होईल.

४. आपण व्हिनेगर व बेकिंग सोड्याच्या मदतीने कार्पेट साफ करु शकतो. पाण्यात (Water) व्हिनेगर व बेकिंग सोडा घालून कार्पेट स्वच्छ करा. त्यामुळे त्यावरील धूळ सहज निघेल.

५. कार्पेटवरील डागांसाठी आपण क्लिनिंग क्लब सोड्याचा आपण वापर करु शकतो. यामुळे कार्पेटमध्ये लपलेले जंत व घाण निघण्यास मदत होईल.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com