Pregnancy tips : गरोदरपणात केशरचे सेवन केल्यास फायदा होतो की, नुकसान जाणून घ्या

गरोदरपणात स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होत असतात.
Pregnancy tips, Saffron benefits
Pregnancy tips, Saffron benefitsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गरोदरपणात स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होत असतात. या अवस्थेत आपल्या घरातील थोर-मोठे व्यक्ती आपल्याला आरोग्यदायी पदार्थ खाऊ घालतात.

हे देखील पहा -

केशर हे औषधी गुणधर्मांपैकी एक आहे याचे आहारात सेवन केल्याने चिंता , तणाव व पोटदुखीच्या समस्यांना तोंड देण्यास मदत होते. केशाराचे सेवन करताना ते अधिक प्रमाणात करु नये त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गरोदर असणाऱ्या महिलांनी केशराचे सेवन मध्यम प्रमाणात असायला हवे. यांचे सेवन केल्यास काय फायदा होईल हे जाणून घेऊया.

केशरचे सेवन करणे गरोदर असणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आहे का ?

केशरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. गरोदरपणात स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतात त्यासाठी तणाव, वेदना व सतत बदलणारे मन व अस्थिरतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी केशरचे सेवन मध्यम प्रमाणात करायला हवे. परंतु, केशरचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने गर्भाशयाच्या आकुंचनास कारणीभूत ठरु शकते व त्यामुळे अकाली प्रसूती होण्याचे प्रमाण वाढू शकते. केशरचे सेवन करायचे असल्यास ते गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यापासून करावे. त्यामुळे बाळाला धोका होण्याची शक्यता कमी होते. केशरांच्या फक्त १ ते २ काड्याचा समावेश करायला हवा. कृत्रिम रंगाचे केशराचे सेवन करु नका.

Pregnancy tips, Saffron benefits
Baby Care Tips: ६ महिन्यांचा बाळाला अन्नपदार्थ कसे द्याल ? त्यात कोणते पदार्थ असायला हवे ?

केशाराचे फायदे -

१. गरोदरपणात आपल्या शारीरिक व मानसिक अवस्थेत अनेक बदल होतात. मन सतत विचलीत होत असते अशावेळी केशाराचे (Saffron) सेवन फायदेशीर ठरेल.

२. गरोदरपणात स्त्रीच्या (Womens) रक्तदाबावर परिणाम होत असतो. केशराचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

३. मॉर्निंग सिकनेसमुळे बऱ्याचदा स्त्रीला कंटाळवाणे व सुस्त वाटू लागते. त्यासाठी केशराचे सेवन केल्यास मळमळ व उलटी कमी होण्यास मदत होईल.

४. खाल्यानंतर बऱ्याचदा अशा अवस्थेत पोटदुखीचा त्रास होऊ लागतो व त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. पचनक्रिया सुलभ करण्यासाठी केशराचे सेवन फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com