Health Tips : पायात होणाऱ्या वेदनांचा यकृताशी संबंध असू शकतो का? जाणून घ्या

यकृत शरीरातील एक महत्वाचा ऑर्गन आहे ते अनेक कार्य पार पाडण्यास मदत करतात.
Health Tips
Health Tips Saam Tv

Health Tips : यकृत शरीरातील एक महत्वाचा ऑर्गन आहे ते अनेक कार्य पार पाडण्यास मदत करतात. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह होताना त्यातील हानीकारक पदार्थ काढण्याचे काम यकृत करते.

तसेच रक्तातील साखरची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी यकृत मदत करते. पित्त तयार करणे, चरबी पचण्यास मदत करणे, जीवनसत्वे पोषणास आवश्यक, रक्तातील कोेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवणे त्यासाठी साठी यकृत हा शरीरातील एक महत्वाचा घटक आहे.

Health Tips
Health Tips : तुमच्या दैनंदिन जीवनातील 'या' सवयी बदल्या नाही, तर होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

तुमचे यकृत निरोगी (Healthy) रहाणे हे फार गरजेचे असते. यकृताच्या समस्या आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊन वेगवेगळ्या आजारांना बळी पडावे लागते. फॅटी लिव्हरचा त्रास सुरू होण्यापूर्वी कोणतीही लक्षणे आढलुन आली नाही तरी हा आजार झाल्याने वाढत जातो.

तेव्हा आरोग्याच्या (Health) समस्या निर्माण होतात. पायात वेदनांचा त्रास होत असेल हे लक्षण सतत दिसत असेल तर यकृताच्या समस्या होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया पायातील काही लक्षणे.

पायांना खाज सुटणे -

यकृताचा आजाराच्या लक्षणांपैकी पायाला खाज सुटणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. यकृतातील पित्तनलिका अवरोदित होतात आणि खराब होतात त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण अधिक जास्त वाढते. पित्त तयार होऊ शकते. यामुळे हाता आणि पायांवर खूप खाज सुटते.

Health Tips
Health Tip : जीभेचा रंग वारंवार का बदलतो ? नेमके कारण काय ? 'हा' आजार की, समस्या

पायावर सूज येणे -

त्याच्या आजाराचे सर्वसामान्य लक्षण म्हणजे पाय दुखणे आणि पायावर सूज येणे. जेव्हा यकृत अयोग्य रित्या काम करते तेव्हा शरीराच्या खालच्या भागात जास्त विषारी पदार्थ तयार होतात, त्यामुळे पायावर सूज येते.

यकृत रोग जसे की सिरोसिस पोर्टल हायपर टेन्शन नावाची स्थिती असू शकते त्यामुळे पायामध्ये अशुद्ध रक्तवाहिन्या पासून गाठीच्या नसा तयार होऊन पायांमध्ये तीव्र वेदना होतात आणि पायांवर सूज येते.

पायात मुंग्या येणे -

अल्कोहोलिक फॅटी लिव्हर यामुळे पाय सुन्न होतात आणि मुंग्या येणे यासारखी लक्षणे उद्भवू शकतात या स्थितीला पॅरिसिया असे म्हणतात ही स्थिती नसांना प्रभावित करते. जर तुम्हाला तुमच्या पायात अशी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडून वेळेवर तपासणी करून घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com