Clarified Butter : गायीचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा व केसांसाठी अधिक उपयुक्त

गायीचे तूप हे अनेक आजारांवर फायदेशीर आहे.
Clarified Butter
Clarified ButterSaam Tv

Clarified Butter : गायीचे तूप हे अनेक आजारांवर (Disease) फायदेशीर आहे. चमचाभर तुपाचे दिवसातून एक वेळा सेवन केल्यास अनेक आजारांवर मात करता येते.

वजन कमी करण्यासाठी अनेक जण डायटिंग सुरू केल्यानंतर सर्वात पहिले तुप खाणे बंद करतात. या पाठीमागचे त्यांचे कारण तुप खाल्ल्यामुळे वजन वाढते. परंतु, तुप हे आरोग्यासाठी (Health) रामबाण आहे. देशी तुपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते.

Clarified Butter
Type 3 Diabetes : टाइप- 1 व टाइप-2 पेक्षा अधिक भयंकर आहे टाइप - 3 चा मधुमेह, 'या' व्यक्तींनी वेळीच व्हा सावध...

काही आजारांमध्ये डॉक्टरांतर्फे तुप खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला सर्वच रुग्णांना देण्यात येत नाही. आज तुम्हाला देशी तुप खाल्ल्यामुळे काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

देशी तुपाचे फायदे -

- देशी तुप पचण्यास एकदम हलके असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम या सारखे अनेक पोषक तत्व देखील उपल्ब्ध असतात.

- देशी तुप खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

- देशी तुपाने डोक्याची मालिश केल्यामुळे केस लवकर पांढरे होत नाही तसेच त्वचेमध्ये चमक येण्यास मदत होत

- रोज शुद्ध तुप खाल्ल्याने वात आणि पित्ताचा त्रास नाहीसा होतो.

- मुलांच्या जन्मानंतर शरीरातील वात वाढ होते. त्यासाठी शुद्ध तुप खाल्ले पाहिजे.

- हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास तुप लुब्रिकेंटचे काम करते.

- गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदशीर आहे.

- डाळी शिजवतांना तुप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

- तसेच तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.

Clarified Butter
Weight loss Tips : पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोज सकाळी 'हे' सूप प्या, आठवड्याभरात फरक दिसेल

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त -

शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट होऊन त्वचा मॉयश्चराइज होते. स्किन नरिश करण्याबरोबर त्वचेतील ड्रायनेस कमी करण्यास मदत होते. शुद्ध तुपाने चेह-याचे मसाज करणे उत्तम असते. केस चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी डोक्याला शुद्ध तुपाने मालिश करावी. यामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते. भाजलेल्या अथवा शरीरावरील जखमेची खुण कमी करते.

हृदयासाठी -

शुद्ध तुपाच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल नियंत्रणात राहते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. शुद्ध तुपामध्ये व्हिटॅमिन के2 असते. यामुळे ब्लड सेलमध्ये जमलेले कॅल्शियम नष्ट करण्याचे काम करते. यामुळे ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते.शुद्ध तुपाच्या सेवनामुळे इम्यून सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते. यामुळे इन्फेक्शनमुळे होणा-या आजारांशी लढण्यास ताकद मिळते. शुद्ध तुपामध्ये सूक्ष्म जीवाणु, ऍन्टी-कॅंन्सर आणि ऍंटी-व्हायरल एजेंट उपलब्ध असते. यामुळे अनेक आजारांशी लढा देण्यास मदत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com