
आज जन्माष्टमीचा जल्लोष संपूर्ण देशभर होत आहे. सर्व ठिकाणी दहीहंडीचा उत्सव रंगताना दिसत आहे. मुंबई आणि दहीहंडीचं वेगळंच नात आहे. अनेक पथक खूप मोठमोठे थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. मुंबईतील अशाच काही पथकांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेन.
मुंबईत सोसायटीपासून ते मोठ्या मंडळामंध्ये दहीहंडी साजरी केली जाते. महिनाभर आधीपासून तयारी करत मोठी मंडळ थर लावतात. दरवर्षी अजून जास्त थर लावण्याचा प्रयत्न करतात. मुंबईतील दहीहंडीचे विशेष आकर्षण म्हणजे सेलिब्रिटी. अनेक सेलिब्रिटी मोठमोठ्या मंडळाना हजेरी लावतात. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
1. जय जवान गोविंदा पथक (Jai Jawan Govinda Pathak)
जय जवान गोविंदा पथक हे मुंबईतील सर्वात जास्त थर लावणारे पथक आहे. या मंडळाने अनेक विक्रम केले आहेत. जय जवान पथकाचे थर पाहणे ही एक पर्वणीच असते. जोगेश्वरी येथील जय जवान पथकाने १० ऑगस्ट २०१२ रोजी ठाणे येथील टीएमसी शाळेच्या मैदानावर ९ थर लावले होते. त्याची उंटी १३.३४ मीटर होती. जय जवान गोविंदा पथकाने तेव्हापासून २० पेक्षा जास्त वेळा ९ थर यशस्वीरित्या चढवले होते.
2. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (GSB)
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे किंग्ज सर्कलमधील सर्वात जुने मंडळ आहे. हे मंडळ दहीहंडीसाठी विशेष ओळखले जाते. हे मंडळ खूप मोठे थर लावतात. या पथकाची दहीहंडी पाहायला अनेक लोकांची गर्दी होते.
3. बाळ गोपाळ मित्र मंडळ, लालबाग
मुंबईतील लालबाग येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे उत्सवांसाठी ओळखले जाते. बाळ गोपाळ मित्र मंडळ हे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. अनेक लोक या पथकाची दहीहंडी पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करतात. लालबाग हे फक्त गणपती उत्सवासाठी नव्हे तर सर्व उत्साहांसाठी प्रसिद्ध आहे. याचे हे पथक उत्तम उदाहरण आहे.
4. बाळ गोपाळ गोविंदा उत्सव
भायखळा येथील बाळ गोपाळ गोविंदा उत्सव पथक हे खूप जुने मंडळ आहे. या मंडळाला या वर्षी शतक पूर्ण झाले आहे. या पथकाची सुरुवात लालबाग आणि भायखळा परिसरातील कापड गिरणी कामगारांनी केली होती.
5. संस्कृती युवा प्रतिष्ठान
आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी मोठ्या दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला जातो. या मंडळाने अनेक मोठ्या मोठ्या दहीहंडीला हजेरी लावली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.