Video: तब्बल 9 तासापेक्षा जास्त वेळ केलं Plank; गिनीज बुकमध्ये नोंद

विश्वविक्रम अनेक असतात ते तोडण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. पण या जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी रेकॉर्ड केले आहेत.
Video: तब्बल 9 तासापेक्षा जास्त वेळ केलं Plank; गिनीज बुकमध्ये नोंद
Video: तब्बल 9 तासापेक्षा जास्त वेळ केलं Plank; गिनीज बुकमध्ये नोंद Twitter/@GWR

विश्वविक्रम अनेक असतात ते तोडण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. पण या जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी रेकॉर्ड केले आहेत. सध्या एक व्यक्ती तूफान चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाचा एका माणसाने Plank करण्याचा विक्रम नोंदवला आहे. अहवालानुसार, डॅनियल स्कालीने (Daniel Scali) 9 तास, 30 मिनिटे आणि 1 सेकंद Plank करून नवीन विश्वविक्रम केला आहे. यासह, स्केलीचे नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. (longest time in the abdominal plank position)

डॅनियल स्केलीच्या आधी अमेरिकेच्या जॉर्ज हूडने सर्वात जास्त वेळ Plank करण्याचा विक्रम केला होता. हुडने फेब्रुवारी 2020 मध्ये 8 तास, 15 मिनिटे आणि 15 सेकंद Plank करण्याचा विक्रम केला होता. Plank हा असा एक व्यायाम आहे, ज्याद्वारे तुम्ही पोट आणि कंबरेची चरबी खूप लवकर कमी करू शकता. Plank दरम्यान, स्केलीने डाव्या हातात कॉम्प्रेशन बँड घातला होता, जेणेकरून तो वेदना कमी करू शकेल आणि बराच काळ या आसनात स्वतःला धरून ठेवेल. स्कालीने गेल्या महिन्यात हा विक्रम केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आता याला अधिकृत मान्यता दिली आहे.

Video: तब्बल 9 तासापेक्षा जास्त वेळ केलं Plank; गिनीज बुकमध्ये नोंद
Good News: 'कोकण'वासीयांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा!

वयाच्या 12 व्या वर्षी त्याचा अपघात झाला होता, ज्यामध्ये त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. स्काली म्हणतो की अगदी थोडासा वारा, पाणी किंवा स्पर्श त्याला वेदना देतो. हेच कारण आहे की Plank दरम्यान, त्याने डाव्या हातात कॉम्प्रेशन बँड घातला होता. पण याआधी स्कालीने जिममध्ये खूप घाम गाळला आहे. त्याच्या प्रशिक्षणाबद्दल बोलताना, स्काली म्हणाला की त्याने शेकडो पुश अप आणि सिट अप करून स्वतःला बळकट केले आहे. त्याने सांगितले की Plank दरम्यान, त्याचे पंजे सुन्न झाले होते आणि गुडघे दुखू लागले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com