Dark Circles In Skin : काळ्या वर्तुळांनी चेहऱ्याचे सौंदर्य कमी केलं? घरगुती उपाय ट्राय करुन पाहा, त्वचा उजळण्यास होईल मदत

Dark Circles On Eyes : सततचा ताण, मोबाईलचा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे चेहऱ्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांखाली काळे वर्तुळ येतात
Dark Circles In Skin
Dark Circles In SkinSaam Tv

Dark Circles Home Remedies :

सुंदर दिसण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो. वाढते प्रदूषण, चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

परंतु, डोळ्यांखाली येणारे काळ्या वर्तुळाचे मुख्य कारण आहे सततचा ताण, मोबाईलचा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे चेहऱ्यावर त्याचा परिणाम होतो. चेहऱ्यावर डाग दिसू लागले की, चेहऱ्याची चमक कमी होते. यासाठी आपण विविध फेस पॅक, क्रीम इत्यादींचा वापर करतो. काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य खराब झाले असेल तर हे घरगुती उपाय करुन पाहा.

Dark Circles In Skin
Cloves Benefits : रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ लवंग, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे

1. बदाम तेल

काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बदामाचे (Almond) तेल खूप प्रभावी आहे. यासाठी रात्रीच्या वेळी बदामाच्या तेलाचे २-३ थेंब घेऊन डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करा.

2. टोमॅटो आणि लिंबाचा रस

टोमॅटो आणि लिंबाचा रस वापरूनही काळी वर्तुळे दूर करू शकता. टोमॅटोच्या रसात 4-5 थेंब लिंबाचा रस मिसळा आणि कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली (Eye) लावा. सुमारे 10-15 मिनिटे ठेवा. काही दिवसांनी तुम्हाला काळी वर्तुळे हलकी दिसू लागतील.

3. काकडी

काकडीचा वापर काळी वर्तुळे दूर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी काकडीचा तुकडा कापून डोळ्यांवर ठेवा. असे रोज केल्याने काळी वर्तुळे कमी होतील.

Dark Circles In Skin
Vastu Tips For Shoe Rack : घरातील या ठिकाणी चुकूनही ठेवू नका चप्पल, होईल धनहानी

4. अननस आणि हळद (turmeric)

2 चमचे अननसाच्या रसात 1 चिमूट हळद मिसळा. हे मिश्रण डोळ्यांखाली लावा. सुमारे 10-15 मिनिटांनी पाण्याने धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com