Ragi Benefits : मुलांच्या शरीरातील कॅल्शियम कमी झाले ? याप्रकारे खाऊ घाला नाचणी, होतील अधिक स्ट्राँग

Is Ragi Good For Calcium : दुध हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले.
Ragi Benefits
Ragi Benefits Saam tv

Nachaniche Fayde : लहान मुले दुध व दुग्धजन्य पदार्थ खाताना नाक मुरडतात. परंतु, दुध हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले की, हाडे ठिसूळ होतात ज्यामुळे उठताना-बसताना आपल्याला त्रास होता.

परंतु, जर मुलांना दुधाचे (Milk) पदार्थ खाण्यास आवडत नसतील तर आपण त्यांना नाचणीचे पदार्थ खाऊ घालू शकतो. ज्यामुळे त्यांच्या शरीरात लॅक्टोज इंटोलरन्ट शरीरात निर्माण होतो. नाचणी ही कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये 100gm मध्ये साधारण 364 mg कॅल्शियम असते. असे, मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी आहारतज्ज्ञ आणि क्लिनीक पोषणतज्ज्ञ उषाकिरण सिसोदिया यांनी सांगितले.

Ragi Benefits
Ragi Barfi Recipe : तुम्हालाही मधुमेह आहे ? गोड खाऊ शकत नाही, मग ही नाचणीची बर्फी नक्की करुन पाहा

नाचणी हाडांचे आरोग्य (Health) सुधारणे, रक्तातील गाठी आणि रक्तातील कॉलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यावर नियंत्रण ठेवते तसेच रक्तवाहिन्यासंबंधी विकार होण्याचा धोका कमी करण्याबरोबरच, कॅल्शियमची कमतरता नैसर्गिकरीत्या कमी करण्यास देखील मदत करते. असे, गोदरेज मेमोरियल हॉस्पिटलच्या (एमडी), सल्लागार फिजिशियन डॉ. अद्रिता बॅनर्जी यांनी सांगितले.

नाचणी हा कॅल्शियमचा (Calcium) एक उत्तम स्त्रोत असणारा पदार्थ असला तरी, यात फायबर, पोटॅशियम, जस्त, लोह, आणि मॅग्नेशियम इत्यादींचा देखील समावेश असतो. गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल येथील आहारतज्ज्ञ योगिता चव्हाण यांनी दूध आणि दूग्धजन्य पदार्थांना टाळले तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते असे त्यांनी सांगितले आहे. 100gm नाचणीमध्ये साधारण 364 mg कॅल्शियम असते, तर तुलनेत 100ml गायीच्या दुधात 118mg कॅल्शियम असते. त्यामुळे नाचणी दुधापेक्षा चांगला कॅल्शियमचा स्त्रोत असून इतर दुग्धजन्यपदार्थांसाठी उत्तम पर्याय ठरते.

Ragi Benefits
Ragi Idli Recipe : मधुमेहाला कंट्रोल करेल नाचणीची इडली, अशाप्रकारे बनवा परफेक्ट रेसिपी

1. कोणत्या पध्दतीने तुम्ही नाचणीचे सेवन करु शकता?

नाचणी ही विविध वयोगटासाठी योग्य आहे आणि त्याचे विविध पदार्थ प्रत्येकाच्या आवडीनुसार तयार केले जाऊ शकतात. नाचणीच्या पिठापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जाऊ शकतात. उदा. डोसा, इडली, डाळ, भाकरी, उपमा इत्यादी.

नाचणी ही ग्लूटेन-फ्री पदार्थ आहे. जी ग्लूटेन आणि दुग्धजन्य पदार्थांवर फायदेशीर ठरेल. नाचणीमध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. दूधात फक्त कॅल्शियमचाच नाही तर प्रोटीन, व्हिटॅमिन 'डी', व्हिटॅमिन 'बी' यांचा देखाल पुरवठा असतो.

2. दूधाचे पर्याय

जर तुम्हाला दुध प्यायला आवडत नसेल किंवा दुधाची अॅलर्जी असेल तर तुमच्याकडे शरीरात कॅल्शियमचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. " दही आणि ताकासारखे दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असलेले पर्याय आहेत.

Ragi Benefits
Ragi Benefits : मधुमेहांपासून ते चेहऱ्याच्या अनेक विकारांवर बहुगुणी ठरेल नाचणी !

याव्यतिरिक्त, शेंगदाणा, बदाम, काजू आणि बिया कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहेत. त्याचबरोबर सुके खोबरे हे देखील इतर आवश्यक पोषक तत्त्वांसह कॅल्शियम असते. पण त्यांच्यातील उच्च कॅलरीजमुळे त्यांचे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे.

आपल्या दैनंदिन आहारात नाचणीचा समावेश केल्याने यातील उच्च आहारातील फायबर सामग्री, कमी ग्लायसेमीक निर्देशांक आणि उच्च कॅल्शियम सामग्री यांच्यामुळे ते फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com