Dengue Symptoms : डेंग्यूच्या आजारामुळे टक्कल पडण्याचा धोका? ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

Dengue Causes : सध्या देशभरात डेंग्यूच्या आजारांने थैमान मांडले आहे. या तापामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
Dengue Symptoms
Dengue SymptomsSaam Tv

Dengue Causes Hair Falls :

सध्या देशभरात डेंग्यूच्या आजारांने थैमान मांडले आहे. या तापामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. डेंग्यूचा ताप आल्यास अशक्तपणा, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, स्नायू दुखणे आणि उलट्या-जुलाब होतात.

तसेच काही रुग्णांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो तर काहींना चक्कर देखील येते. डेंग्यूमुळे प्लेटलेट्सची पातळीही झपाट्याने घसरते. यामुळे लो बीपीपासून ते इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशातच डेंग्यूची नवीन लक्षणे समोर आली आहेत. यामध्ये अनेकांना केसगळतीची समस्या सतावत आहे. ज्यांना अधिक काळ डेंग्यूचा ताप आला आहे. अशा व्यक्तींमध्ये डेंग्यू आणि मलेरियामुळे केस गळण्याची समस्या दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Dengue Symptoms
Coconut Water Increase Platelets : डेंग्यूमुळे शरीरातील पेशी कमी झाल्या आहेत? नारळपाणी प्यायल्याने फायदा होईल का? तज्ज्ञांचे मत

TV9 च्या मुलाखतीत दिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील त्वचारोगतज्ज्ञ ल डॉ. भावुक धीर म्हणाले की, डेंग्यूचे (Dengue) रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या तापामुळे केसगळतीची समस्या देखील उद्भवली आहे. डेंग्यूमुळे जास्त ताप येतो. ज्यामुळे तणाव वाढतो. वाढत्या ताणामुळे शरीरातील पेशी कमी होतात. पेशींच्या कमतरतेमुळे केस वाढीच्या समस्याही उद्भवतात. जेव्हा या पेशी प्रभावित होतात तेव्हा केस गळू लागतात.

डॉ.धीर सांगतात की, डेंग्यूनंतर केस गळतीची (Hair Falls) समस्या सुरु झाली तर त्यावर कोणताही उपचार घेण्याची गरज नाही. फक्त पुरेशा प्रमाणात योग्य आहार घेतल्यास यावर मात करता येते. तसेच आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा (Vitamins) समावेश करा. याशिवाय मानसिक ताण घेणे टाळा.

1. डेंग्यू आणि मलेरियानंतर केस गळणे

डॉक्टर धीर यांनी सांगितले की, महिन्याभरापूर्वी त्यांच्याकडे डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आले होते. ज्यांच्यात केसगळतीची समस्या पाहायला मिळाली. या रुग्णांमध्ये ३० ते ४० वयोगटातील लोकांची संख्या अधिक आहे. यामध्ये केस गळण्याची इतरही अनेक कारणे आहेत. यामध्ये मानसिक तणाव, आहारातील कमतरता, खराब जीवनशैली आणि अनुवांशिक कारणांचाही समावेश होतो.

Dengue Symptoms
White Hair Problem : खोबरेल तेलात हा पदार्थ मिसळून लावा, पांढरे केस होतील काळेभोर

2. डेंग्यूपासून बचाव करणे महत्त्वाचे

सध्या डेंग्यूचे अनेक रुग्ण येत आहेत. काही प्रकरणांमध्ये रुग्णाची प्रकृतीही बिघडते. अचानक शरीरातील प्लेटलेट्सची पातळी घसरते, जी घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत डेंग्यूपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला ताप असेल आणि त्याचे तापमान 100 अंशांपेक्षा जास्त असेल तर नक्कीच डेंग्यूची तपासणी करा. चाचण्या वेळेवर केल्याने आजार ओळखण्यास मदत होईल.

Dengue Symptoms
Smart and Intelligent Women : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com